छत्रपती संभाजीनगर | एस के शेख फुलंब्री प्रतिनिधी
महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील सटाणा फाटा येथे दुष्काळग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थानिक शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी, पिकांचे नुकसान आणि विविध समस्यांची माहिती जाणून घेतली.
शेतकऱ्यांच्या नुकसानीची वस्तुनिष्ठ माहिती घेऊन अचूक पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. शासन शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, त्यांच्या अडचणी व झालेल्या नुकसानीबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असा विश्वास यावेळी देण्यात आला.
यावेळी आमदार नारायण भाऊ कुचे, छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रामबाबा शेळके, खरेदी-विक्री संघाचे संचालक भाऊराव मुळे, भाजपा मंडळ अध्यक्ष सुदाम ठोंबरे यांच्यासह शेतकरी, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
महाराष्ट्र न्यूज टाइम्स
संपादक दिनेश गायके



