छत्रपती संभाजीनगर, दि. २ ऑक्टोबर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त तसेच माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने आज अभिवादन करण्यात आले.
महापौर समीर राजूरकर आणि स्थायी समिती सभापती अनिल मकरीये यांनी शाहगंज येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी गलिच्छ वस्ती सुधार समिती सभापती जालिंदर शेंडगे, नगरसेवक ऋषिकेश जयस्वाल, सचिन खैरे, मनपा आयुक्त अमोल येडगे, उपायुक्त नंदकिशोर भोंबे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्ज्वला भामरे, मुख्य उद्यान अधिकारी विजय पाटील, सहाय्यक आयुक्त रमेश मोरे, जनसंपर्क अधिकारी अहमद तौसीफ यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यानंतर महानगरपालिका मुख्यालयात माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी स्थायी समिती सभापती अनिल मकरीये आणि मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी उपायुक्त नंदकिशोर भोंबे, मुख्य उद्यान अधिकारी विजय पाटील, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्ज्वला भामरे यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



