मनपा, दि. 01 ऑक्टोबर : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका के.प्रा.व.मा.शा. किराडपुरा न*.1 येथील के.मुख्याध्यापिका तथा विस्तार अधिकारी खान रईसा बेगम यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र येथे आयोजित कार्यक्रमात त्यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला.
यावेळी शहराचे महापौर श्री. समीर राजूरकर, स्थायी समिती सभापती श्री. अनिल मकरीये, विरोधी पक्षनेता अब्दुल समीर साजिद, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत आणि मनपा आयुक्त श्री. अमोल येडगे,
नगरसेवक ओसामा कदीर मौलाना, वसीम अहमद, अब्दुल्ला हिलाबी, सोहेल खान, नगरसेविका तरन्नुम अकील अहमद, उप आयुक्त अंकुश पांढरे, जालना मनपा उप.अयुकत नंदा गयकवाड तत्कालीन उप आयुक्त अय्युब खान यांच्यासह शाळेतील शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी, सहकारी व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना महापौर श्री. समीर राजूरकर म्हणाले, “खान रईसा बेगम यांनी आपल्या सेवाकाळात अत्यंत निष्ठेने आणि समर्पण भावनेने काम केले. त्यांच्या कार्यातून महापालिका शाळेच्या विकासासाठी असलेली त्यांची तळमळ दिसून येते. त्यांच्या कार्याचा निश्चितच इतर शिक्षकांना आदर्श घेता येईल.” तसेच शाळेच्या विकासामध्ये तत्कालीन उपायुक्त अय्युब खान यांचेही योगदान राहिले असल्याचे त्यांनी नमूद केले.
विभागीय आयुक्त जी. श्रीकांत म्हणाले, “खान रईसा बेगम यांच्यासारखे समर्पित शिक्षक आणि मुख्याध्यापक प्रत्येक महापालिका व शासकीय शाळेत असणे गरजेचे आहे. मी आयुक्त म्हणून कार्यरत असताना महापालिका शाळांच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा केला. किराडपुरा शाळेचा चेहरामोहरा बदलण्यात रईसा बेगम यांचे मोठे योगदान आहे. या कामाचे संपूर्ण श्रेय त्यांना जाते.”
मनपा आयुक्त श्री. अमोल येडगे म्हणाले, “खान रईसा बेगम यांच्यासोबत काम करण्यासाठी मला फारसा वेळ मिळाला नाही; मात्र त्यांनी यापूर्वी केलेल्या कामाचा आढावा घेतल्यानंतर त्यांच्या कार्याची व्याप्ती आणि गुणवत्ता लक्षात येते. त्यांनी केलेले काम भविष्यातील शिक्षक आणि मुख्याध्यापकांसाठी निश्चितच मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरेल.”
यावेळी ओसामा कदीर मौलाना, अंकुश पांढरे आणि अय्युब खान यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी खान रईसा बेगम तसेच अय्युब खान यांनी उपस्थित मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी, सहकारी आणि मित्रपरिवाराचे आभार मानले. कार्यक्रमादरम्यान सहकारी शिक्षक व विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करत खान रईसा बेगम यांच्या सेवाकाळातील आठवणींना उजाळा दिला.



