गणोरी 🙁 एस के शेख फुलंब्री प्रतिनिधी) जागृत देवस्थान क्षेत्र गणोरी येथे मंगळी संकष्ट चतुर्थीनिमित्त श्री दीनदयाळ गणपती मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन उत्साहात करण्यात आले. यावेळी श्री बंडू सपकाळ यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
तसेच सप्तरंगी भजनी मंडळ, गणोरी यांच्या वतीने भक्तिमय भजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गणरायाचे दर्शन घेतले.
यावेळी भजनी मंडळाचे अध्यक्ष शिवाजी भादवे दादा तसेच माऊली श्री बंडू सपकाळ यांचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार श्री काशिनाथ पां. तांदळे, श्री मनोहर पां. गायकवाड, श्री संतोष पां. गायकवाड, श्री पंडित मामा बोडके, श्री रामू पां. उबाळे, श्री जनार्दन पां. भादवे, श्री योगेश पां. म्हस्के, श्री आप्पासाहेब पां. तांदळे, श्री विनोद पां. चेद्रे, श्री विलास पेहेरकर, श्री त्रिंबक शेळके, श्री गजानन चेद्रे, श्री दत्ता भादवे व श्री सुभाष तांदळे यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान गणपती बाप्पाच्या जयघोषाने परिसर भक्तिमय झाला. महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला. धार्मिक आणि सामाजिक एकोप्याचे दर्शन घडविणारा हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.



