कन्नड तालुक्यातील गणेशपूर येथील श्री गणेशपूर जागृत देवस्थान गणपती मंदिरात चोरीची घटना घडली. मंदिरातील गणपतीचा मुकुट अज्ञात चोरट्याने चोरून नेला. या घटनेमुळे भाविकांमध्ये खळबळ उडाली आहे.
चोरीच्या घटनेची माहिती मिळताच चोरीचा तपास करण्यासाठी पोलिसांची विविध पथके घटनास्थळी दाखल झाली असून, चोरट्याचा शोध सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान, मंदिर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मुकुट चोरणारा संशयित कैद झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या फुटेजच्या आधारे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
घटनेचा अधिक तपशील आणि चोरीला गेलेल्या मुकुटाची किंमत याबाबत पोलिस तपासानंतर माहिती स्पष्ट होणार आहे.



