फुलंब्री : (एस के शेख फुलंब्री प्रतिनिधी) देवगिरी सहकारी साखर कारखाना लि., गिरिजानगर (ता. फुलंब्री) येथील अधिमंडळाची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न झाली. या सभेला आमदार अनुराधाताई चव्हाण आणि आमदार सुहासभाऊ शिरसाठ यांची प्रमुख उपस्थिती होती.
फुलंब्री व परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी, कामगार आणि सभासदांच्या हितासाठी कारखाना व्यवस्थापनाकडून विविध स्तरांवर प्रयत्न करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. आगामी काळात कारखान्याची कार्यक्षमता वाढवून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
सभेला कारखान्याचे संचालक मंडळ, ज्येष्ठ नेते, अधिकारी, कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने सभासद व शेतकरी बांधव उपस्थित होते. सभेदरम्यान कारखान्याच्या कामकाजाबाबत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
प्रतिनिधी | महाराष्ट्र न्यूज टाइम्स



