जागतिक रेबीज दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेअंतर्गत पशुचिकित्सालय, बाजीपुरा येथे पाळीव प्राण्यांसाठी मोफत रेबीज लसीकरण आयोजित करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत श्वान, मांजर तसेच इतर पाळीव प्राणी अशा एकूण ३० पाळीव प्राण्यांना मोफत रेबीज प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. तसेच उपस्थित सर्व पशुपालकांना पाळीव प्राण्यांचा परवाना काढण्याबाबत सूचना देण्यात आल्या व त्यानुसार काहींचे त्वरित ऑनलाइन अर्ज भरून घेण्यात आले.
नागरिकांनी आपल्या पाळीव प्राण्यांचे वेळेवर रेबीज प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे तसेच महानगरपालिकेच्या नियमानुसार पाळीव प्राण्यांचा परवाना काढून घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
सदर उपक्रम पशुसंवर्धन विभागाचेविभाग प्रमुख विजय पाटील यांचे मार्गदर्शन अंतर्गत प्रभारी पशुवैद्यकीय अधिकारी श्री. अनंत जाधव प्र पशुवैद्यकीय अधिकारी ,श्री. शेख शाहेद पशुधनअधिकारी ,श्री. फिरोज खान यांच्या पशुचिकित्सालय, बाजीपुरा येथे राबविण्यात आला.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. अभ्युदय तुपसुंदरे, पशुधन पर्यवेक्षक, श्री. सय्यद मतीन, श्रीमती कल्पना अवसरमोल, श्री. बिलाल मिर्झा व श्री. रईस पठाण यांनी सहकार्य केले.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका
पशुसंवर्धन विभाग



