छत्रपती संभाजीनगर :(एस के शेख प्रमुख प्रतिनिधी फुलंब्री)बालरंगभूमी परिषद आणि एमजीएम युनिव्हर्सिटीच्या संगीत व नाट्य शिक्षण विभागाच्या सहकार्याने एमजीएम रुक्मिणी सभागृह येथे ‘जल्लोष लोककलेचा’ या लोकनृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आदर्श किनगाव येथील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवित गोंधळ गीत तसेच आदिवासी लोकनृत्य सादर केले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा किनगावने तृतीय क्रमांक पटकावला. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेच्या वतीने सर्व बालकलाकार, शिक्षक आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात आले. लोककलेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीची ओळख करून देण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला.



