दि. 27 सप्टेंबर
जागतिक रेबीज दिनानिमित्त च्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका व Mission Rabies – WVS Hope यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमान बाळासाहेब ठाकरे बॉटॅनिकल गार्डन, सिडको रोड येथे “Small Animal First Aid, Rescue & Rabies Awareness Workshop” चे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात Dr. Anahita Kumar, Clinical Director, WVS Hope यांनी उपस्थितांना लघु प्राण्यांसाठी प्रथमोपचार, बचावकार्य (Rescue), CPR, तसेच रेबीज प्रतिबंध आणि जनजागृती याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी जखमी व आजारी प्राण्यांना मदत करताना घ्यावयाची काळजी, आपत्कालीन परिस्थितीत करावयाच्या उपाययोजना आणि रेबीज प्रतिबंधासाठी लसीकरणाचे महत्त्व यावर भर दिला.
या कार्यशाळेस छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका पशुसंवर्धन विभाग प्रमुख विजय पाटील यांचे मार्गदर्शन अंतर्गत श्री. अनंतराव जाधव ,प्रभारी पशु वैद्यकीय अधिकारी, शेख शाहेद ,पशुधन विकास अधिकारी,श्री. अभिदुप तुपसुंदरे पशुधन पर्वेक्षक उपस्थित होते. तसेच Mission Rabies – WVS Hope तर्फे आकाश बेडवाल, सागर धुमाळ व अमित धवन यांनी सहभाग नोंदवला.
कार्यक्रमास शहरातील प्राणीप्रेमी व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये करुणा मॅडम, नम्रता सुराळे, राखी ठाकूर, चेतन वानखेडे, ऋषी जैस्वाल, प्रतीक जाधव, झफर शेख, वसीम मिर्झा, बेरील सांचीस, जयेश शिंदे आदींचा समावेश होता.
प्राणी कल्याण, प्रथमोपचार कौशल्ये आणि रेबीजमुक्त समाज निर्मितीचा संदेश देणारी ही कार्यशाळा यशस्वीरीत्या पार पडली. उपस्थितांनी अशा उपक्रमांचे नियमित आयोजन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
“त्यांचा आवाज बनूया, त्यांची मदत बनूया” या संदेशासह कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.



