गणोरी : (एस के शेख मुख्य प्रतिनिधी फुलंब्री) छत्रपती संभाजीनगर तालुका फुलंब्री मधील गणोरी येथे ग्रामस्थांच्या वतीने यंदाचा गणेश विसर्जन सोहळा डीजेमुक्त वातावरणात मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. भजन, टाळ-मृदुंगाच्या गजरात तसेच ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.
गावातील सर्व श्री गणेशभक्तांनी मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला. शांतता, शिस्त आणि सामाजिक सलोखा राखत उत्सव साजरा करण्यात आल्याने गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
या कार्यक्रमाला छत्रपती संभाजीनगर जिल्हा डीवायएसपी मॅडम यांनी भेट देऊन ग्रामस्थांचे कौतुक केले. डीजेमुक्त व शांततेत गणेशोत्सव साजरा केल्याबद्दल त्यांनी ग्रामस्थांचे शब्दसुमनांनी अभिनंदन केले.
यावेळी ग्रामस्थांच्या वतीने डीवायएसपी मॅडम तसेच उपस्थित पोलीस अधिकारी यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. पोलीस प्रशासन आणि ग्रामस्थांच्या समन्वयातून गणेश विसर्जनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि शांततेत पार पडला.
‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!’ या जयघोषात गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.




