Close Menu
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

सातारा–देवळाईचा पाण्याचा यक्षप्रश्न सुटणार तरी कधी?

November 1, 2026

माईंड पॉवर कार्यशाळेतून मनाच्या शक्तीची ओळख करून देणार

November 1, 2026

छत्रपती संभाजीनगरकरांनो… स्वतःमधील शक्ती ओळखा आणि बदलाची सुरुवात करा!

October 31, 2026

Our Visitor

0 4 4 4 3 9
Facebook X (Twitter) Instagram
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Facebook X (Twitter) Instagram
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Subscribe
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Home»छत्रपती संभाजीनगर»आसिफिया कॉलनीत ३९ अनधिकृत नळ जोडण्या खंडित १० हजारांचा दंड वसूल
छत्रपती संभाजीनगर

आसिफिया कॉलनीत ३९ अनधिकृत नळ जोडण्या खंडित १० हजारांचा दंड वसूल

Maharashtranewstimes2026@gmail.comBy Maharashtranewstimes2026@gmail.comSeptember 25, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

आयुक्तांच्या पाहणीनंतर धडक कारवाई

माहिती व जनसंपर्क विभाग
दि. २४ सप्टेंबर
शहरातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासोबतच पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने अनधिकृत नळ जोडण्यांविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. आज सकाळी मनपा आयुक्त अमोल येडगे शहर पाहणी दौऱ्यावर असताना रस्त्यावर मोठ्या प्रमाणात स्वच्छ पाणी वाहत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याची गंभीर दखल घेत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कारवाईचे निर्देश दिले.
आयुक्तांच्या निर्देशानुसार बेगमपुरा रोडवरील घाटी रुग्णालयाच्या मागील बाजूस असलेल्या आसिफिया कॉलनी परिसरात विशेष कारवाई करण्यात आली. परिसरातील २५० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवरून घेण्यात आलेल्या आणि रस्त्यावर पाणी वाहून जाण्यास कारणीभूत ठरणाऱ्या तब्बल ३९ अनधिकृत नळ जोडण्या मनपा पथकाने खंडित केल्या. तसेच पाण्याचा अपव्यय करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करून १० हजार रुपयांचा दंड जागेवरच वसूल करण्यात आला.
ही कारवाई अतिरिक्त आयुक्त-२ कल्पिता पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कार्यकारी अभियंता दत्तात्रय गायकवाड, उपअभियंता मिलिंद भामरे, कनिष्ठ अभियंता सचिन वेलदोडे, पथक अभियंता रोहित इंगळे यांच्यासह अनधिकृत नळ शोध पथकाचे कर्मचारी आणि नागरी सहाय्यक पथक या कारवाईत सहभागी झाले.
शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या अनधिकृत नळ जोडण्या तसेच पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांविरोधात यापुढेही कठोर कारवाई केली जाणार असल्याचे महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पाणी हे सार्वजनिक संपत्ती असून त्याचा अपव्यय किंवा बेकायदेशीर उपसा कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Maharashtranewstimes2026@gmail.com
  • Website
  • Facebook
  • Instagram

Related Posts

सातारा–देवळाईचा पाण्याचा यक्षप्रश्न सुटणार तरी कधी?

November 1, 2026

माईंड पॉवर कार्यशाळेतून मनाच्या शक्तीची ओळख करून देणार

November 1, 2026

छत्रपती संभाजीनगरकरांनो… स्वतःमधील शक्ती ओळखा आणि बदलाची सुरुवात करा!

October 31, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजीनगर

सातारा–देवळाईचा पाण्याचा यक्षप्रश्न सुटणार तरी कधी?

By Maharashtranewstimes2026@gmail.comNovember 1, 20260
Spread the love

– दहा वर्षे महापालिकेत, कोट्यवधींचा महसूल; तरी नागरिकांच्या घशाला कोरड सातारा–देवळाई परिसराचा २०१६ मध्ये छत्रपती…

माईंड पॉवर कार्यशाळेतून मनाच्या शक्तीची ओळख करून देणार

November 1, 2026

छत्रपती संभाजीनगरकरांनो… स्वतःमधील शक्ती ओळखा आणि बदलाची सुरुवात करा!

October 31, 2026

डॉ. गोंधणे १३ नोव्‍हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे

October 31, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Editors Picks
Top Reviews
Advertisement
Demo
maharashtranewstimes.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo YouTube
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
About Us
Maharashtra News Times हे एक विश्वासार्ह डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही वाचकांना अचूक, निष्पक्ष आणि ताज्या बातम्या वेळेवर देण्यावर भर देतो.
राजकारण, समाज, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि स्थानिक घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
वाचकांचा विश्वास जपणे आणि सत्य माहिती पोहोचवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
डिजिटल माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हीच आमची बांधिलकी आहे.

Contact Us
संपादक: दिनेश गायके
मोबाईल: +91 99232 37970
ईमेल: Maharashtranewstimes2026@gmail.com
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.