Close Menu
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

गणेश विसर्जन मिरवणूक मार्गाची मनपा व पोलीस प्रशासनाकडून संयुक्त पाहणी

September 24, 2026

फायनान्सच्या 68 हजारांसाठी लुटीचा बनाव; दोघे गंगापुर पोलिसांच्या जाळ्यात लुटीची कहाणी ठरली बनाव;

September 23, 2026

पोलीस प्रशासनाचे पालकांना आवाहन

September 23, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Facebook X (Twitter) Instagram
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Subscribe
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Home»छत्रपती संभाजीनगर»गणेश विसर्जन मिरवणूक मार्गाची मनपा व पोलीस प्रशासनाकडून संयुक्त पाहणी
छत्रपती संभाजीनगर

गणेश विसर्जन मिरवणूक मार्गाची मनपा व पोलीस प्रशासनाकडून संयुक्त पाहणी

Maharashtranewstimes2026@gmail.comBy Maharashtranewstimes2026@gmail.comSeptember 24, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

मिरवणूक मार्गावरील अतिक्रमणे, अनधिकृत केबल, वीजवाहिन्या व बांधकाम साहित्य हटविण्याच्या सूचना

मनपा, दि. २३ सप्टेंबर : येत्या २५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने आज गणेश विसर्जन मिरवणूक मार्गाची संयुक्त पाहणी करण्यात आली. महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये, मनपा आयुक्त अमोल येडगे आणि पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्यासह महानगरपालिका, पोलीस प्रशासन व महावितरणचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी संस्थान गणपती मंदिर, राजाबाजार येथून शहागंज, सिटी चौक, गुलमंडी मार्गे संभाजीपेठ येथील जिल्हा परिषद मैदानातील विसर्जन विहिरीपर्यंतच्या मुख्य मिरवणूक मार्गाची पायी पाहणी केली. मिरवणूक सुरळीत व सुरक्षितपणे पार पडण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी सूचना करण्यात आल्या.
मिरवणूक मार्गावरील सर्व अनधिकृत केबल तातडीने काढून टाकाव्यात, महावितरणच्या वीजवाहिन्यांची आवश्यकतेनुसार उंची वाढवावी, तसेच मार्गावर पाइपलाइन टाकण्यासाठी करण्यात आलेल्या खोदकामाच्या ठिकाणी पडून असलेला बांधकाम मलबा, पाइप व इतर साहित्य तातडीने हटवावे, अशा सूचना देण्यात आल्या. तसेच मार्गावरील उघडी असलेली पाण्याची व्हॉल्व झाकून ठेवावीत आणि मिरवणूक मार्गावरील अतिक्रमणे हटवावीत, असे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले.
विसर्जन विहिरींची पाहणी
यावेळी पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी संभाजीपेठ येथील जिल्हा परिषद मैदानातील विसर्जन विहीर, क्रीडा संकुल परिसरातील विसर्जन विहीर तसेच शिवाजीनगर येथील विसर्जन विहिरींची पाहणी केली. विसर्जनासाठी येणाऱ्या नागरिकांची सुरक्षितता, स्वच्छता, प्रकाश व्यवस्था, वाहतूक व्यवस्था तसेच आवश्यक सोयी-सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवण्याच्या सूचना आयुक्त अमोल येडगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
क्रीडा संकुलातील विसर्जन विहिरीचा वापर करण्याचे आवाहन
गारखेडा परिसरातील क्रीडा संकुल येथे यंदा प्रथमच गणेश विसर्जनासाठी विसर्जन विहीर सज्ज करण्यात आली आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोकळी जागा, नागरिकांसाठी आवश्यक सुविधा तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने चांगली व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी गणेशमूर्ती विसर्जनासाठी क्रीडा संकुल परिसरातील विसर्जन विहिरीचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन महापौर, पदाधिकारी आणि मनपा आयुक्तांनी केले.
गणेश विसर्जनाच्या दिवशी नागरिकांची गैरसोय होऊ नये तसेच मिरवणूक शांततेत, सुरक्षित आणि सुरळीतपणे पार पडावी यासाठी महानगरपालिका, पोलीस प्रशासन आणि संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Maharashtranewstimes2026@gmail.com
  • Website
  • Facebook
  • Instagram

Related Posts

फायनान्सच्या 68 हजारांसाठी लुटीचा बनाव; दोघे गंगापुर पोलिसांच्या जाळ्यात लुटीची कहाणी ठरली बनाव;

September 23, 2026

पोलीस प्रशासनाचे पालकांना आवाहन

September 23, 2026

छत्रपती संभाजीनगरातील खासगी आस्थापनांना CCTV बंधनकारक

September 23, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजीनगर

गणेश विसर्जन मिरवणूक मार्गाची मनपा व पोलीस प्रशासनाकडून संयुक्त पाहणी

By Maharashtranewstimes2026@gmail.comSeptember 24, 20260
Spread the love

मिरवणूक मार्गावरील अतिक्रमणे, अनधिकृत केबल, वीजवाहिन्या व बांधकाम साहित्य हटविण्याच्या सूचना मनपा, दि. २३ सप्टेंबर…

फायनान्सच्या 68 हजारांसाठी लुटीचा बनाव; दोघे गंगापुर पोलिसांच्या जाळ्यात लुटीची कहाणी ठरली बनाव;

September 23, 2026

पोलीस प्रशासनाचे पालकांना आवाहन

September 23, 2026

छत्रपती संभाजीनगरातील खासगी आस्थापनांना CCTV बंधनकारक

September 23, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Editors Picks
Top Reviews
Advertisement
Demo
maharashtranewstimes.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo YouTube
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
About Us
Maharashtra News Times हे एक विश्वासार्ह डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही वाचकांना अचूक, निष्पक्ष आणि ताज्या बातम्या वेळेवर देण्यावर भर देतो.
राजकारण, समाज, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि स्थानिक घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
वाचकांचा विश्वास जपणे आणि सत्य माहिती पोहोचवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
डिजिटल माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हीच आमची बांधिलकी आहे.

Contact Us
संपादक: दिनेश गायके
मोबाईल: +91 99232 37970
ईमेल: Maharashtranewstimes2026@gmail.com
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.