५० मीटर परिसराचे कव्हरेज, किमान १५ दिवसांचे रेकॉर्डिंग सुरक्षित ठेवण्याचे आदेश
छत्रपती संभाजीनगर : शहरातील गुन्हेगारीला आळा घालणे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रविण पवार यांनी शहरातील खासगी आस्थापनांमध्ये दर्जेदार CCTV कॅमेरे बसविणे बंधनकारक केले आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ मधील कलम १६३ अन्वये हा आदेश जारी करण्यात आला आहे.
आदेशानुसार, संबंधित आस्थापनांच्या सीमारेषेपासून किमान ५० मीटर परिसर स्पष्टपणे कव्हर होईल, अशा दिशेने व गुणवत्तेचे CCTV कॅमेरे बसवणे आवश्यक आहे. CCTV यंत्रणा २४ तास कार्यरत ठेवावी तसेच त्याचे फुटेज किमान १५ दिवस सुरक्षित ठेवणे बंधनकारक आहे. आवश्यकतेनुसार पोलिसांनी मागणी केल्यास संबंधित फुटेज उपलब्ध करून द्यावे.
संशयास्पद हालचाल किंवा घटना निदर्शनास आल्यास तातडीने जवळच्या पोलीस ठाण्याला कळविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम २२३ अन्वये कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.
या आस्थापनांना आदेश लागू
बँका, एटीएम, हॉटेल्स, लॉज/गेस्ट हाऊस, मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, पेट्रोल पंप, ज्वेलर्स, शाळा-कॉलेज, रुग्णालये, धार्मिक स्थळे, जिम, चित्रपटगृहे तसेच टॉवर्स/कार्यालयीन इमारतींसह इतर खासगी आस्थापनांना हा आदेश लागू आहे.
पोलीस प्रशासनाने संबंधित आस्थापनांनी आदेशाचे पालन करून नागरिकांच्या सुरक्षेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
छत्रपती संभाजीनगरातील खासगी आस्थापनांना CCTV बंधनकारक
Related Posts
Add A Comment

