Close Menu
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

मध्यवर्ती कारागृहात ‘श्री गणेशा आरोग्याचा २०२६’ उपक्रम

September 21, 2026

३१ वर्षांची परंपरा जपत साई पार्क गणेश मंडळाची आकर्षक वाटचाल

September 21, 2026

PMAY 1.0 : घरकुलासाठी 22 सप्टेंबरपर्यंत अर्जाची संधी

September 19, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Facebook X (Twitter) Instagram
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Subscribe
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Home»छत्रपती संभाजीनगर»मध्यवर्ती कारागृहात ‘श्री गणेशा आरोग्याचा २०२६’ उपक्रम
छत्रपती संभाजीनगर

मध्यवर्ती कारागृहात ‘श्री गणेशा आरोग्याचा २०२६’ उपक्रम

Maharashtranewstimes2026@gmail.comBy Maharashtranewstimes2026@gmail.comSeptember 21, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

छत्रपती संभाजीनगर : मध्यवर्ती कारागृह, हर्सूल येथे कारागृहातील बंदीजनांसाठी ‘श्री गणेशा आरोग्याचा २०२६’ या उपक्रमांतर्गत आरोग्य तपासणी, कर्करोग निदान शिबिर तसेच वैद्यकीय उपकरणे प्रदान करण्याचा कार्यक्रम १९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला.
धर्मादाय सह-आयुक्त तथा सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर, मराठवाडा धर्मादाय वकील संघ आणि मध्यवर्ती कारागृह, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच शहरातील विविध धर्मादाय रुग्णालयांच्या सहभागातून हा उपक्रम राबविण्यात आला.
शिबिरात हृदयरोग तपासणी, कर्करोग निदान, कान-नाक-घसा व डोळे तपासणी, महिलांसाठी पॅप स्मीअर तपासणी, मूळव्याध व त्वचारोग तपासणी, मोतीबिंदू तपासणी, रक्तदाब व मधुमेह तपासणी तसेच हाडांची तपासणी करण्यात आली. गरजूंसाठी मोफत चष्मे वाटप करण्यात आले. याशिवाय सीपीआर प्रात्यक्षिक व प्रशिक्षणही देण्यात आले.
वैद्यकीय उपकरणांचे योगदान
विविध संस्थांनी उपक्रमासाठी वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून दिली. त्यामध्ये डेंटल चेअर – १, पॅथॉलॉजी लॅबसाठी सेल काऊंटर – १, ईसीजी मशीन विथ डायग्नोसिस – १, औषधांसाठी रेफ्रिजरेटर – १, स्ट्रेचर – २, तपासणी टेबल – २ आणि व्हीलचेअर – २ यांचा समावेश आहे.
या उपकरणांसाठी ग्लोबल फाउंडेशन, सेंट लॉरेन्स एज्युकेशन ट्रस्ट, मानव विकास कल्याण प्रतिष्ठाण, परिपूर्ती मेडिकल फाउंडेशन, इंडियन इन्स्टिट्यूट फॉर रुरल डेव्हलपमेंट, भाऊराया फाउंडेशन आणि फैज-ए-आम ट्रस्ट यांनी योगदान दिले.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमास मा. श्री. नितीन भगवंतराव सूर्यवंशी, प्रशासकीय न्यायमूर्ती, मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद हे सन्माननीय प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. नितीन हनमंतराव जाधव, धर्मादाय सह-आयुक्त, छत्रपती संभाजीनगर होते.
प्रमुख उपस्थितींमध्ये श्रीमती उषा चव्हाण-पाटील, धर्मादाय उपआयुक्त; श्री. प्रभू कापडे, सहाय्यक धर्मादाय आयुक्त; श्री. अनिल ह. खामकर, अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह हर्सूल; तसेच ॲड. श्री. चंद्रकांत पं. वरुडीकर, अध्यक्ष, मराठवाडा धर्मादाय वकील संघ, ॲड.अक्षय खोत ॲड मिलिंद सिसोदे पाटील ॲड श्रीकांत मिश्रा ॲड योगेश ढोबळे ॲड अनिल गावंडे तसेच इतर विधीज्ञ हजर होते यांचा समावेश होता.
या उपक्रमासाठी महात्मा गांधी मिशन (एमजीएम) रुग्णालय, सेठ नंदलाल धूत रुग्णालय, डॉक्टर हेडगेवार रुग्णालय, एमएमआरआय, कमलनयन बजाज हॉस्पिटल, चिकलठाणा लायन्स आय हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, बीएसपी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, इंडियन मेडिकल असोसिएशन आणि एमआयटी रुग्णालय सहभागी झाले.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Maharashtranewstimes2026@gmail.com
  • Website
  • Facebook
  • Instagram

Related Posts

३१ वर्षांची परंपरा जपत साई पार्क गणेश मंडळाची आकर्षक वाटचाल

September 21, 2026

PMAY 1.0 : घरकुलासाठी 22 सप्टेंबरपर्यंत अर्जाची संधी

September 19, 2026

वसीम शेख यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव

September 8, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजीनगर

मध्यवर्ती कारागृहात ‘श्री गणेशा आरोग्याचा २०२६’ उपक्रम

By Maharashtranewstimes2026@gmail.comSeptember 21, 20260
Spread the love

छत्रपती संभाजीनगर : मध्यवर्ती कारागृह, हर्सूल येथे कारागृहातील बंदीजनांसाठी ‘श्री गणेशा आरोग्याचा २०२६’ या उपक्रमांतर्गत…

३१ वर्षांची परंपरा जपत साई पार्क गणेश मंडळाची आकर्षक वाटचाल

September 21, 2026

PMAY 1.0 : घरकुलासाठी 22 सप्टेंबरपर्यंत अर्जाची संधी

September 19, 2026

वसीम शेख यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव

September 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Editors Picks
Top Reviews
Advertisement
Demo
maharashtranewstimes.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo YouTube
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
About Us
Maharashtra News Times हे एक विश्वासार्ह डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही वाचकांना अचूक, निष्पक्ष आणि ताज्या बातम्या वेळेवर देण्यावर भर देतो.
राजकारण, समाज, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि स्थानिक घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
वाचकांचा विश्वास जपणे आणि सत्य माहिती पोहोचवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
डिजिटल माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हीच आमची बांधिलकी आहे.

Contact Us
संपादक: दिनेश गायके
मोबाईल: +91 99232 37970
ईमेल: Maharashtranewstimes2026@gmail.com
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.