Close Menu
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

मध्यवर्ती कारागृहात ‘श्री गणेशा आरोग्याचा २०२६’ उपक्रम

September 21, 2026

३१ वर्षांची परंपरा जपत साई पार्क गणेश मंडळाची आकर्षक वाटचाल

September 21, 2026

PMAY 1.0 : घरकुलासाठी 22 सप्टेंबरपर्यंत अर्जाची संधी

September 19, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Facebook X (Twitter) Instagram
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Subscribe
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Home»कला»३१ वर्षांची परंपरा जपत साई पार्क गणेश मंडळाची आकर्षक वाटचाल
कला

३१ वर्षांची परंपरा जपत साई पार्क गणेश मंडळाची आकर्षक वाटचाल

Maharashtranewstimes2026@gmail.comBy Maharashtranewstimes2026@gmail.comSeptember 21, 2026Updated:September 21, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

छत्रपती संभाजीनगर : साई पार्क, म्हाडा कॉलनी, एन -7 सिडको येथील साई पार्क गणेश मंडळाने यंदा गणेशोत्सवाचे ३१वे वर्ष पूर्ण केले आहे. सन १९९५ मध्ये स्थापन झालेल्या या मंडळाची सुरुवात तीन दशकांपूर्वी लहान मुलांच्या सहभागातून झाली. त्यावेळी बालगोपाल म्हणून मंडळाशी जोडलेली मुले आज मोठी झाली असून, मंडळाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत आहेत. काळानुसार मंडळाला नवे आणि आकर्षक स्वरूप देतानाच विविध उपक्रमांची भर घालण्याचे काम सातत्याने सुरू आहे.

मंडळाच्या स्थापनेपासूनच सामूहिक सहभाग आणि विविध सामाजिक-सांस्कृतिक उपक्रम हे प्रमुख वैशिष्ट्य राहिले आहे. दरवर्षी नवीन पदाधिकारी आणि कार्यकर्ते विविध जबाबदाऱ्या स्वीकारत असले, तरी ३१ वर्षांची ही परंपरा सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांतून पुढे जात आहे.

गणेशोत्सवानिमित्त मंडळात लहान मुलांसाठी हस्ताक्षर व चित्रकला स्पर्धा, एक मिनिट शो, संगीत खुर्ची, डीजे नाईट, क्रिकेट लीग, व्हॉलीबॉल, फुटबॉल व कबड्डी स्पर्धा, सामूहिक अग्निहोत्र, होम मिनिस्टर, विविध वेशभूषा स्पर्धा, आनंदनगरी, महाआरती, मोठ्यांसाठी अंताक्षरी, महाप्रसाद, सत्यनारायण पूजा, बक्षीस वितरण आणि गणेश विसर्जन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

विशेष म्हणजे, दरवर्षी उपक्रमांमध्ये नवनवीन कल्पनांची भर घालून गणेशोत्सव सर्व वयोगटांना सहभागी करून घेणारा आणि आनंददायी करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे साई पार्क गणेश मंडळाचा उत्सव हा केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता, परिसरातील नागरिकांना एकत्र आणणारा सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम ठरत आहे.

या ३१ वर्षांच्या प्रवासाचे श्रेय कोणत्याही एका व्यक्तीला न देता, आजवर मंडळाशी जोडलेल्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सदस्य, महिला, ज्येष्ठ नागरिक, बालगोपाल आणि साई पार्क परिसरातील नागरिकांच्या सामूहिक योगदानाला जाते. दरवर्षी जबाबदाऱ्यांमध्ये बदल होत असले तरी मंडळाची परंपरा, एकजूट आणि कार्याची भावना कायम राहिली आहे. साई पार्क परिवारातील महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक, युवती आणि बालगोपाल अशा प्रत्येक घटकाचा मंडळाच्या उपक्रमांमध्ये अधिकाधिक सहभाग कसा वाढेल, त्याच्या कलागुणांना आणि क्षमतेला व्यासपीठ मिळाल्यास मंडळाला आणखी व्यापक आणि भव्य स्वरूप प्राप्त होऊ शकते.
३१ वर्षांची ही गौरवशाली परंपरा पुढे नेताना सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि विधायक उपक्रमांच्या माध्यमातून साई पार्क गणेश मंडळाने छत्रपती संभाजीनगरच्या गणेशोत्सवात आपली वेगळी ओळख आणखी मजबूत करावी, तसेच पुढील पिढीलाही या परंपरेशी जोडावे, अशा मनःपूर्वक शुभेच्छा मंडळातील सर्व कार्यकर्ते व सदस्यांना देण्यात येत आहेत.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Maharashtranewstimes2026@gmail.com
  • Website
  • Facebook
  • Instagram

Related Posts

मध्यवर्ती कारागृहात ‘श्री गणेशा आरोग्याचा २०२६’ उपक्रम

September 21, 2026

PMAY 1.0 : घरकुलासाठी 22 सप्टेंबरपर्यंत अर्जाची संधी

September 19, 2026

वसीम शेख यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव

September 8, 2026
Add A Comment

Comments are closed.

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजीनगर

मध्यवर्ती कारागृहात ‘श्री गणेशा आरोग्याचा २०२६’ उपक्रम

By Maharashtranewstimes2026@gmail.comSeptember 21, 20260
Spread the love

छत्रपती संभाजीनगर : मध्यवर्ती कारागृह, हर्सूल येथे कारागृहातील बंदीजनांसाठी ‘श्री गणेशा आरोग्याचा २०२६’ या उपक्रमांतर्गत…

३१ वर्षांची परंपरा जपत साई पार्क गणेश मंडळाची आकर्षक वाटचाल

September 21, 2026

PMAY 1.0 : घरकुलासाठी 22 सप्टेंबरपर्यंत अर्जाची संधी

September 19, 2026

वसीम शेख यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव

September 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Editors Picks
Top Reviews
Advertisement
Demo
maharashtranewstimes.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo YouTube
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
About Us
Maharashtra News Times हे एक विश्वासार्ह डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही वाचकांना अचूक, निष्पक्ष आणि ताज्या बातम्या वेळेवर देण्यावर भर देतो.
राजकारण, समाज, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि स्थानिक घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
वाचकांचा विश्वास जपणे आणि सत्य माहिती पोहोचवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
डिजिटल माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हीच आमची बांधिलकी आहे.

Contact Us
संपादक: दिनेश गायके
मोबाईल: +91 99232 37970
ईमेल: Maharashtranewstimes2026@gmail.com
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.