छत्रपती संभाजीनगर : प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) 1.0 अंतर्गत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या माध्यमातून 3,408 घरांचे प्रकल्प राबविण्यात येत आहेत. महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी इच्छुक लाभार्थ्यांना अर्ज प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
कुठे सुरू आहेत प्रकल्प?
पडेगाव, तिसगाव (गट क्र. 225/1 व 227/1), सुंदरवाडी आणि हर्सूल येथे घरकुल प्रकल्प सुरू आहेत.
10% लाभार्थी हिस्सा दोन टप्प्यांत
आतापर्यंत सुमारे 2,100 लाभार्थ्यांनी 10% रक्कम जमा केली आहे. उर्वरित पात्र लाभार्थ्यांना ही रक्कम दोन टप्प्यांत भरण्याची सुविधा देण्यात आली आहे.
अर्जाची अंतिम मुदत : 22 सप्टेंबर 2026
इच्छुक पात्र लाभार्थ्यांनी 22 सप्टेंबरपर्यंत अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. केंद्राच्या नियमानुसार PMAY 1.0 ची निवड प्रक्रिया 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
महत्त्वाचे : PMAYचा लाभ केवळ छत्रपती संभाजीनगरमधील नागरिकांपुरता मर्यादित नसल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत अटी व कागदपत्रांची माहिती तपासावी.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका – अधिकृत संकेतस्थळhttps://youtu.be/Qqoz0phuzOU?si=44p1li4dk_NqeEnj
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
PMAY 1.0 : घरकुलासाठी 22 सप्टेंबरपर्यंत अर्जाची संधी
Related Posts
Add A Comment

