छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांच्या चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
छत्रपती संभाजीनगर, दि. १ : पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या ‘रस्ता सुरक्षा अभियाना’अंतर्गत ग्रामीण जिल्ह्यातील २३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील जिल्हा परिषद माध्यमिक शाळांमध्ये चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत तब्बल १५,१२३ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत आपल्या कलाकृतींतून रस्ता सुरक्षेचा प्रभावी संदेश दिला.
‘वाहतूक नियम पाळूया, अपघात टाळूया’ आणि ‘हेल्मेट व सीट बेल्ट – जीवांच्या सुरक्षेचे कवच’ या विषयांवर विद्यार्थ्यांनी चित्रे साकारली. वाहतूक नियमांचे पालन, वेगमर्यादा, हेल्मेट-सीट बेल्टचा वापर, सिग्नलचे पालन आणि पादचारी सुरक्षा याबाबत विद्यार्थ्यांनी जनजागृती केली.
स्पर्धेतील कलाकृतींचे २ सप्टेंबर रोजी परीक्षण होणार असून, प्रत्येक पोलीस ठाणे हद्दीतील प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात येणार आहे. ७ सप्टेंबर रोजी २३ प्रथम क्रमांक विजेत्यांचा पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या हस्ते सत्कार केला जाणार आहे. उत्कृष्ट चित्रे पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या दर्शनी भागात लावण्यात येणार आहेत.
१५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या सहभागातून ‘वाहतूक नियम पाळा, स्वतःचा आणि इतरांचा जीव सुरक्षित ठेवा’ हा संदेश ग्रामीण भागात प्रभावीपणे पोहोचला.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
१५ हजार विद्यार्थ्यांनी चित्रांतून दिला रस्ता सुरक्षेचा संदेश
Related Posts
Add A Comment

