छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळे तसेच नागरिकांना आवाहन करण्यात येते की, सन २०२६ मधील गणेशोत्सवाच्या अनुषंगाने तात्पुरता मंडप / स्टेज उभारावयाचा असल्यास महानगरपालिकेची आवश्यक परवानगी घेणे बंधनकारक आहे.
तात्पुरत्या मंडप / स्टेज उभारणीच्या परवानगीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक ०२ सप्टेंबर २०२६ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत कार्यालयीन वेळेत उपलब्ध राहील. मंडळे / नागरिकांनी अर्ज करण्यापूर्वी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेली ‘मार्गदर्शक तत्त्वे – २०२६’ काळजीपूर्वक वाचून त्यानुसार परिपूर्ण अर्ज सादर करावा.
महत्त्वाच्या सूचना
१. मंडप / स्टेज उभारण्यासाठी संबंधित प्राधिकरणाची आवश्यक परवानगी घेणे आवश्यक आहे.
२. केवळ अर्ज दाखल केला आहे म्हणून परवानगी मिळाली असे समजू नये. परवानगी प्राप्त झाल्यानंतरच मंडप / स्टेज उभारणी करावी.
३. परवानगीशिवाय उभारलेला मंडप / स्टेज हटविण्यात येईल तसेच संबंधितांविरुद्ध नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
४. मंडप / स्टेजमुळे रस्त्यावरील वाहतूक, पादचारी मार्ग किंवा नागरिकांच्या ये-जा करण्यास अडथळा निर्माण होणार नाही, याची संबंधित मंडळांनी दक्षता घ्यावी.
५. उत्सवाच्या कालावधीत परिसरातील नागरिकांना त्रास होणार नाही तसेच ध्वनीप्रदूषणासंबंधी नियमांचे पालन होईल, याची दक्षता घ्यावी.
६. गणेशोत्सव शांततेत, सुव्यवस्थित व सुरक्षित पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्व गणेश मंडळे व नागरिकांनी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेस सहकार्य करावे.
७. त्याच श्री गणेश मूर्ती विक्रीसाठी स्टॉल उभारण्यासाठी ही याच एक खिडकी मार्फत परवानगी दिली जाईल. परवानगी घेऊन च स्टॉल उभारणी करण्याची दक्षता घेण्यात यावी . त्यासाठी कोणत्याही प्रकारची वाहतूक अडथळा होणार नाही याची दक्षता संबधित स्टॉल धारक यांनी घ्यायची आहे
— आयुक्त
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका.

