वरूड शिवार (ता. जि. छत्रपती संभाजीनगर) येथे चिकलठाणा पोलीस यांनी ऑलआऊट व कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान कारवाई करत अवैध गोवंश कत्तलीचा प्रयत्न उधळून लावला आहे. शेत गट नं. ३२३ मधील एका गोठ्याजवळ लिंबाच्या झाडाखाली छापा टाकून पोलिसांनी ५ गोवंश जनावरांची सुरक्षित सुटका केली.
दिनांक २८/०८/२०२६ रोजी रात्रौ ०३:१५ वा. सुमारास ऑलआऊट व कोम्बिंग ऑपरेशन सुरू असताना पोलीस पथकाला गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार वरूड शिवारात शेत गट नं. ३२३ मध्ये छापा टाकला असता, आरोपींनी स्वतःच्या आर्थिक गैरफायद्यासाठी गुन्हेगारी कट रचून, अत्यंत बेकायदेशीर व अमानुष रितीने चारा-पाण्याविना कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेली ५ गोवंश जनावरे आणि कत्तलीचे साहित्य आढळून आले.
पोलीस पथकाने तत्परता दाखवत सुमारे १,१५,०००/- रुपये किंमतीची ५ गोवंश जनावरे व कत्तलीचे साहित्य जागीच जप्त केले. जप्त करण्यात आलेली जनावरे सुरक्षिततेच्या दृष्टीने चिकलठाणा येथील गोशाळेत सुपूर्द करण्यात आली आहेत.
आरोपी:
१. सलमान युसूफ खान
२. जावेद युसूफ खान
(दोन्ही रा. वरूडकाजी शिवार, शेत गट नं. २३२, ता. जि. छत्रपती संभाजीनगर)
सदर प्रकरणी आरोपींविरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० चे कलम ११(१)(A), ११(१)(D), ११(१)(H) सह महाराष्ट्र पशुसंवर्धन (संरक्षण) अधिनियम १९७६ चे कलम ५(A), ९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. प्रकाश जाधव, पोलीस अधीक्षक, मा. प्रशांत स्वामी, अपर पोलीस अधीक्षक व मा. श्रीमती पूजा नांगरे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र बनसोडे आणि त्यांच्या पोलीस पथकाने केली आहे.

