Close Menu
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

वसीम शेख यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव

September 8, 2026

मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीत बिघाड; ११व्या दिवशी सात किलो वजन घटले

September 8, 2026

फुलंब्री तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Facebook X (Twitter) Instagram
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Subscribe
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Home»राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय»गुन्हेगारी»घातक रासायनिक कचऱ्याच्या बहुराज्यीय सिंडिकेटचा मास्टरमाईंड अखेर जेरबंद; इस्तेकार खानच्या अटकेने ‘विषारी नफ्याच्या रॅकेटचे धागेदोरे उघड..
गुन्हेगारी

घातक रासायनिक कचऱ्याच्या बहुराज्यीय सिंडिकेटचा मास्टरमाईंड अखेर जेरबंद; इस्तेकार खानच्या अटकेने ‘विषारी नफ्याच्या रॅकेटचे धागेदोरे उघड..

Maharashtranewstimes2026@gmail.comBy Maharashtranewstimes2026@gmail.comAugust 30, 2026No Comments4 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र न्यूज टाइम्स) छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्ह्यात घातक औद्योगिक रासायनिक केमिकल व पावडरची बेकायदेशीर वाहतूक करून त्याची अवैधरित्या विल्हेवाट लावणाऱ्या बहुराज्यीय सिंडिकेटचा मुख्य सूत्रधार अखेर छ.संभाजीनगर ग्रामीण पोलिसांच्या हाती लागला आहे.
या गुन्ह्यातील फरार मास्टरमाईंड इस्तेकार अहमद निसार खान (वय 38 वर्षे, रा. खमरिया, गैसडी, जि. बलरामपूर, उत्तर प्रदेश, नेपाळ बॉर्डरजवळ) यास सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी अथक पाठपुरावा करून शिताफीने अटक केली आहे. गुन्हा दाखल झाल्यापासुन इस्तेकार खान फरार झाला होता. त्याचा शोध घेण्यासाठी सिल्लोड ग्रामीण पोलिसांचे विशेष पथक उत्तर प्रदेशातील नेपाळ सीमेलगतच्या भागापर्यंत पोहोचले होते. पोलिसांची चाहूल लागताच तो वारंवार ठिकाण बदलून निसटत होता; मात्र पोलिसांनी त्याचा माग सोडला नाही. अखेर तांत्रिक तपास, गोपनीय माहिती आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याच्या आधारे त्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले.

जिल्हयातील पळशी, सिल्लोड शहर, फर्दापूर, आळंद, शिवुर, तोंडापूर आदी ठिकाणी आढळलेल्या घातक रासायनिक ड्रम टाकल्याच्या घटनेपासून सुरू झालेल्या तपासात घटनास्थळी आढळलेले रासायनिक ड्रम, दूषित माती, पर्यावरणाची झालेली हानी, वाहनांची हालचाल, आरोपींचे संपर्क आणि आर्थिक व्यवहार यांची सांगड घालण्यात आली. तपास जसजसा पुढे गेला तसतसे या प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्राबाहेर तेलंगणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशापर्यंत पोहोचल्याचे समोर आले. या कारवाईत आतापर्यंत 1601 ड्रममधील 3,52,220 लिटर घातक औद्योगिक रसायन, 40 टन रासायनिक पावडर, 50 टन रसायनमिश्रित दूषित माती, 3 ट्रक, 1 हायड्रा मशीन आणि 7 मोबाईल फोन असा सुमारे 80.35 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, इस्तेकार खानसह एकूण 12 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांच्या तपासात इस्तेकार खानचा औद्योगिक कचऱ्याच्या विल्हेवाटीशी असलेला जुना संबंधही समोर आला आहे. सन 2005 मध्ये मुंबईतील धारावी येथील गोल्डन कॅस्टल कंपनीत काम करताना त्याला प्लास्टिक वेस्ट जमा करून त्यापासून दाणे तयार करण्याच्या कामाचा अनुभव मिळाला. त्यानंतर भावासोबत प्लास्टिक डिस्पोजलची फर्म सुरू करून त्याने भोईसर व एमआयडीसी परिसरातील प्लास्टिक कचरा जमा करून त्याची विल्हेवाट लावण्याचे काम केले. याच व्यवसायाच्या माध्यमातून हैदराबाद येथील सादिक व हुसैन नावाच्या व्यक्तीशी त्याचा संपर्क आला. सादिकच्या माध्यमातून तेलंगणा राज्यातील मुनीपल्ली, जिल्हा सांगारेड्डी येथील VBR Green Environment Pvt. Ltd. चे मालक वीरेशम भीमैया खरचेला यांच्याशी त्याची ओळख झाली. तर हुसैन च्या माध्यमांतुन राजस्थान राज्यातील निंबहेडा येथील 3R Enviro कंपनीशी त्यांचे संबध आले. त्यानंतर औद्योगिक प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या घातक रासायनिक केमिकल व पावडरची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट न लावता बेकायदेशीर मार्गाने विल्हेवाट लावण्याची साखळी त्यांने तयार केली आहे.
ऑगस्ट 2025 च्या सुमारास सादिकच्या माध्यमातून इस्तेकार खानचा सिल्लोड येथील अब्दुल गफार खान हमीद खान पठाण याच्याशी संपर्क झाला. यानंतर छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्ह्यात रासायनिक केमिकल व पावडरची बेकायदेशीर विल्हेवाट लावण्याची साखळी त्यांने अधिक सक्रिय झाल्याचे तपासातून समोर आले आहे.

या तपासातील सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे प्राथमिक तपासानुसार मागील 10 ते 12 महिन्यांत इस्तेकार खान याने 100 पेक्षा अधिक मालवाहू वाहनांमधून मोठ्या प्रमाणात रासायनिक कचरा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्ह्यात विल्हेवाटीसाठी पाठविले आणि प्रत्येक वाहनात 200 लिटर क्षमतेच्या 100 रासायनिक ड्रम तो पाठवत होता. मागील 10 ते 11 महिन्यांत 10 हजारांपेक्षा अधिक रासायनिक ड्रम तसेच सोडियम बायकार्बोनेट मिश्रित दूषित माती मोठ्या प्रमाणावर विल्हेवाटीसाठी पाठविण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या हाती आली आहे. या कचऱ्याची बेकायदेशीर विल्हेवाट लावण्यासाठी गफार पठाण याला प्रत्येक वाहनामागे अतिरिक्त मोबदला देण्यात येत आला असुन. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण परिसरात रासायनिक कचऱ्याची बेकायदेशीर विल्हेवाट लावण्यासाठी या साखळीतील आरोपींमध्ये 80 लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेचे व्यवहार झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
तपासात राजस्थान राज्यातील निंबाहेडा येथील 3R Enviro कंपनीशी संबंधित अत्यंत घातक रसायनांचाही धागा समोर आला आहे. यामध्ये THF, Chloroform आणि Toluene यांसारख्या उच्च जोखमीच्या औद्योगिक सॉल्व्हेंटचा समावेश असल्याचे घटनास्थळी जप्त ड्रमवरील लेबलवरून प्राथमिक स्वरूपात आढळून आले आहे. रसायनांची अंतिम रासायनिक संरचना शासनमान्य प्रयोगशाळेच्या वैज्ञानिक विश्लेषणानंतर निश्चित होणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शनाखाली जप्त करण्यात आलेले रसायन मान्यताप्राप्त TSDF, पुणे येथे सुरक्षित विल्हेवाटीसाठी पाठविण्यात आले आहे.
मास्टरमाईंड इस्तेकार खानच्या अटकेमुळे या संपूर्ण रॅकेटच्या कार्यपद्धतीबाबत पोलिसांच्या तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली आहे. इस्तेकार खान सध्या पोलीस कस्टडी रिमांडमध्ये असून त्याच्या चौकशीतून या साखळीतील उर्वरित आरोपी, रासायनिक कचऱ्याचा मूळ स्रोत, वाहतूकदार, मध्यस्थ, आर्थिक व्यवहार तसेच रासायनिक कचऱ्याची अंतिम विल्हेवाट नेमकी कुठे व कोणत्या पद्धतीने करण्यात आली, याचा सखोल तपास सुरू आहे. राजस्थान व हैदराबाद येथील या साखळीतील इतर संबंधित आरोपींचाही पोलिसांकडून कसोशीने शोध घेण्यात येत आहे.

मा. प्रकाश जाधव, पोलीस अधीक्षक, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू असून, पर्यावरण, जलस्रोत, शेती आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या या संघटित रॅकेटच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. या प्रकरणात केवळ रासायनिक कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई न करता त्यामागील संपूर्ण पुरवठा, वाहतूक, आर्थिक आणि विल्हेवाटीची साखळी उघड करण्यावर तपास यंत्रणेचा भर आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Maharashtranewstimes2026@gmail.com
  • Website
  • Facebook
  • Instagram

Related Posts

वसीम शेख यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव

September 8, 2026

मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीत बिघाड; ११व्या दिवशी सात किलो वजन घटले

September 8, 2026

फुलंब्री तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन

September 8, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजीनगर

वसीम शेख यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव

By Maharashtranewstimes2026@gmail.comSeptember 8, 20260
Spread the love

कन्नड:- शमाबी बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व आयशा कोचिंग क्लासेसचे संचालक वसीम शेख यांनी शैक्षणिक,…

मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीत बिघाड; ११व्या दिवशी सात किलो वजन घटले

September 8, 2026

फुलंब्री तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन

September 8, 2026

विशेष लेख : विद्यार्थी हिंसक का होतो?

September 3, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Editors Picks
Top Reviews
Advertisement
Demo
maharashtranewstimes.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo YouTube
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
About Us
Maharashtra News Times हे एक विश्वासार्ह डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही वाचकांना अचूक, निष्पक्ष आणि ताज्या बातम्या वेळेवर देण्यावर भर देतो.
राजकारण, समाज, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि स्थानिक घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
वाचकांचा विश्वास जपणे आणि सत्य माहिती पोहोचवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
डिजिटल माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हीच आमची बांधिलकी आहे.

Contact Us
संपादक: दिनेश गायके
मोबाईल: +91 99232 37970
ईमेल: Maharashtranewstimes2026@gmail.com
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.