चिकलठाणा, दि. २९ ऑगस्ट २०२६: न्यू हायस्कूल चिकलठाणा येथे आज पालक मेळावा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती जगताप मॅडम होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे पर्यवेक्षक श्री. शिवनाथ जाधव सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन दामिनी पथकाच्या पीएसआय श्रीमती जाधव मॅडम व सहाय्यक कॉन्स्टेबल श्रीमती वाडेकर मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रास्ताविक भाषणात श्री.गणेश तुपे सर यांनी शाळेच्या ऐतिहासिक परंपरेवर व शैक्षणिक वाटचालीवर प्रकाश टाकला. प्रमुख मार्गदर्शक श्रीमती जाधव मॅडम यांनी विद्यार्थ्यांना करिअर विषयक मार्गदर्शन तसेच मुलींनी वैयक्तिक सुरक्षा कशी घ्यावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात श्रीमती जगताप मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत पालक आणि शिक्षक यांच्यातील सुसंवाद किती महत्त्वाचा आहे हे विशद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती व्ही.स. पाटील मॅडम यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रीमती व्ही.डी. पाटील मॅडम यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वर्गशिक्षक श्री. डि. एन. थोरे सर यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच सर्व शिक्षक बंधू-भगिनी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पालक सभेत सहभाग नोंदवून मोलाचे सहकार्य केले. श्री. डकले सर यांनी सुंदर फलक लेखन करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
या मेळाव्यास पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

