छत्रपती संभाजीनगर : (महाराष्ट्र न्यूज टाईम प्रतिनिधी) जवाहरनगर पोलीस ठाणे हद्दीत राळेपळेकर चौक परिसरातून ५० हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सचिन कैलास निकम (वय २५, रा. हनुमाननगर, छत्रपती संभाजीनगर) यांनी जवाहरनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ मे २०२६ रोजी सायंकाळी ४ ते रात्री ११ वाजण्याच्या दरम्यान फिर्यादीने आपली काळ्या रंगाची होंडा शाइन दुचाकी (क्रमांक एमएच-२०-एफडब्ल्यू-१०७१) राळेपळेकर चौकाच्या बाजूला हॅण्डल लॉक करून पार्क केली होती. दरम्यान, अज्ञात चोरट्याने आर्थिक फायद्याच्या उद्देशाने दुचाकी लबाडीने चोरून नेली.
चोरी झालेल्या दुचाकीची किंमत सुमारे ५० हजार रुपये असून तिचा इंजिन क्रमांक JC63E0283798 आणि चेसीस क्रमांक ME4JC635ADN016464 असा आहे.
या प्रकरणी गु.र.नं. ३७०/२०२६, कलम ३०३(२) बीएनएस अन्वये २८ ऑगस्ट रोजी दुपारी १.४१ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीवर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असल्याने तक्रार देण्यास उशीर झाल्याचे फिर्यादीने पोलिसांना सांगितले.
या प्रकरणाचा तपास मपाह/९३७ धुळे करीत असून, पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली अज्ञात चोरट्याचा शोध सुरू आहे.

