छत्रपती संभाजीनगर येथील तेरणा हायस्कूल मध्ये रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात व पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. शाळेच्या प्रांगणात विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना राखी बांधून औक्षण केले व भाऊ-बहिणीच्या अतूट नात्याला उजाळा दिला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे मुख्याध्यापक श्री. के.पी. पवार यांनी भूषवले. त्यांनी आपल्या भाषणात रक्षाबंधन हा केवळ सण नसून तो बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी आणि सन्मानाची भावना असल्याचे सांगितले.
यावेळी व्यासपीठावर मान्यवर म्हणून केशवराव मुंडे, रमेश प्रधान, रमेश जोशी, भाग्यश्री काळे,उषा उदगे, सिंधू बोर्डे यांची उपस्थित होती.
विद्यार्थिनींनी स्वहस्ते तयार केलेल्या आकर्षक राख्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी “बहिणीचे रक्षण हेच खरे कर्तव्य” अशी प्रतिज्ञा घेतली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदिप भाले तर आभार प्रदर्शन रमेश जोशी यांनी केले.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
तेरणा हायस्कूलमध्ये रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन
Related Posts
Add A Comment

