छत्रपती संभाजीनगर:
श्री सरस्वती भुवन (स. भु.) शिक्षण संस्था आणि महर्षी शिक्षण प्रसारक मंडळ, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संस्कृत नाट्य महोत्सव २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे.
हा सोहळा शनिवार, २९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता श्री स. भु. शिक्षण संस्थेच्या गोविंदभाई श्रॉफ ललित कला केंद्राच्या नाट्यगृहात दोन्ही संस्थांच्या माननीय अध्यक्षांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.
स्पर्धेनंतर त्याच दिवशी दुपारी ४.०० वाजता पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ‘SRD इलेक्ट्रॉनिक्स’चे संचालक श्री. आदित्यजी धाराशिवकर आणि ‘Littion Energy Solution’च्या संचालिका सौ. रश्मी धाराशिवकर उपस्थित राहणार आहेत. तसेच, छत्रपती संभाजीनगरच्या शिक्षणाधिकारी मा. श्रीमती अश्विनी लाठकर यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
संस्कृत नाट्य महोत्सव समितीने (छत्रपती संभाजीनगर) या कार्यक्रमास सर्व रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आग्रहाचे निमंत्रण दिले आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
संस्कृत नाट्य महोत्सव २०२६ चे शनिवारी आयोजन
Related Posts
Add A Comment

