छत्रपती संभाजीनगर, दि.२६: (एस के शेख प्रतिनिधी) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीनं अमरीन गुलाब बानो खान यांनी प्राणिशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी संपादन केली आहे.
“स्टडी ऑफ इन्फेक्शस डिसीजेस अँड देअर मॅनेजमेंट इन फ्रेशवॉटर ऑर्नामेंटल फिशेस ऑफ औरंगाबाद (एम.एस.)” “Study of Infectious Diseases and Their Management in Freshwater Ornamental Fishes of Aurangabad (M.S.)” या शोधप्रबंधास विद्यापीठाने मान्यता दिली.
त्यांनी डॉ. सय्यद अथरुद्दीन कादरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. प्राचार्य डॉ. मजहर फारुकी, उपप्राचार्य डॉ.आरिफ पठाण, डॉ. जे. डी. शेख, डॉ. टी. टी. शेख, डॉ.अधफाव्यू खान आणि डॉ. मुजफ्फर शेख यांनी डॉ. अमरीन बानो यांचा सत्कार करून अभिनंदन केले.
*सोबत फोटो, नोटिफिकेशन*
.

