वारेगाव : (एस के शेख प्रतिनिधी) पवित्र श्रावण मासानिमित्त वारेगाव येथील वारेश्वर गडावरील श्री महादेव मंदिरात आयोजित श्रावणमास अखंड हरिनाम सप्ताहाचा आज भक्तिमय वातावरणात मंगलारंभ झाला. अखंड नामस्मरण, भजन-कीर्तन आणि हरिनामाच्या गजराने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला.
या सप्ताहाच्या माध्यमातून श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्माचा जागर होत असून, पुढील दिवसांतही हा मंगलमय सोहळा अधिकाधिक बहरत राहो, अशी भावना भाविकांनी व्यक्त केली.
या धार्मिक सोहळ्यास श्री प्रकाश मुनी, वारेगाव मठाधिपती संदीप दादा बोरसे, बबनराव जाधव, भैय्यासाहेब, नवनाथ भाऊ, मनसुबराव तसेच वारेगावातील सर्व प्रतिष्ठित गावकरी मंडळी आणि भाविकांची उपस्थिती लाभली.
हरिनामाच्या गजराने परिसर दुमदुमून गेला असून, सप्ताहाच्या निमित्ताने भाविकांमध्ये उत्साहाचे आणि भक्तीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हर हर महादेव! 🙏
राम कृष्ण हरी! 🙏

