शिल्लेगाव पोलीस ठाणे हद्दीतील रांजणगाव पोळ शिवार येथे दिनांक 17/08/2026 रोजी रात्रीच्या सुमारास विहिरीमध्ये बसविण्यात आलेले दोन मोटार पंप चोरीस गेल्याची घटना घडली होती.
सदर घटनेच्या अनुषंगाने दिनांक 21/08/2026 रोजी रात्री पोलीस अंमलदार निसर्ग जेजुरकर हे नाईट पेट्रोलिंग करीत असताना डायल 112 वर कॉल प्राप्त झाला. सदर कॉलवरून रांजणगाव पोळ येथे चार संशयित इसमांना पकडण्यात आले असल्याची माहिती मिळाली.
माहिती मिळताच पोलीस अंमलदार निसर्ग जेजुरकर यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन संशयित इसमांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी आपली नावे अनिकेत रामेश्वर काकडे, कार्तिक आप्पासाहेब घुणे, आदित्य शिवाजी महाराज व समाधान भालचंद शिंदे अशी सांगितली.
सदर संशयित इसमांकडे अधिक चौकशी केली असता, त्यांनी इंस्टाग्रामवरील व्हिडिओ पाहून रांजणगाव पोळ शिवारातील विहिरीमधील दोन पाण्याचे मोटार पंप चोरी केल्याची माहिती दिली.
सदर चारही संशयित इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई झाली असुन चोरीस गेलेल्या मुद्देमाल हस्तगत करुन पुढील तपास सुरू आहे.
सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक साहेब तसेच माननीय अपर पोलीस अधीक्षक सो व माननीय एसडीपीओ सौ गंगापूर पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार गोंडे, पोलीस अंमलदार निसर्ग अर्जुन तायडे यांनी केली असून, पुढील तपास सुरू आहे.
शिल्लेगाव पोलीस ठाणे
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
गंगापूर शिल्लेगाव पोलीस ठाणे हद्दीत विहिरीतील दोन मोटार पंप चोरीचा गुन्हा उघड; चार संशयित ताब्यात
Related Posts
Add A Comment

