गंगापूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा परीक्षेत देशात १४५ वा क्रमांक (AIR 145) मिळवत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या IPS जान्हवी बाळासाहेब शेखर यांची छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिस दलांतर्गत गंगापूर उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) म्हणून नुकतीच नियुक्ती झाली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे गंगापूर उपविभागाच्या पोलीस प्रशासनाची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली आहे.
जान्हवी शेखर यांनी नाशिक आणि पुणे येथे सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू करत सातत्य, कठोर परिश्रम आणि अहोरात्र मेहनतीच्या जोरावर UPSC नागरी सेवा परीक्षेत घवघवीत यश मिळवले.
जान्हवी यांना प्रशासकीय सेवेचा वारसा त्यांच्या कुटुंबातून मिळाला आहे. त्यांचे वडील डॉ. बाळासाहेब शेखर (पाटील) हे वरिष्ठ IPS अधिकारी असून विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून त्यांनी सेवा बजावली आहे. वडिलांच्या प्रशासकीय सेवेमधील निष्ठा, शिस्त आणि समाजसेवेच्या भावनेतून प्रेरणा घेत जान्हवी यांनीही पोलीस सेवेत उल्लेखनीय स्थान निर्माण केले आहे.
परिविक्षाधीन कालावधी पूर्ण केल्यानंतर त्यांना गंगापूर उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून पहिली महत्त्वाची जबाबदारी मिळाली आहे. तरुण आणि गुणवंत अधिकाऱ्याच्या रूपाने त्यांची ही नियुक्ती गंगापूर परिसरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
UPSCमधील देशातील १४५ वा क्रमांक, IPS अधिकारी म्हणून निवड आणि आता गंगापूर SDPO पदाची जबाबदारी असा जान्हवी शेखर यांचा प्रवास युवकांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
UPSCमध्ये AIR 145 मिळविणाऱ्या IPS जान्हवी शेखर यांच्यावर गंगापूर SDPO पदाची धुरा
Related Posts
Add A Comment

