बिडकीन : शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व सुगंधित तंबाखूची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीविरुद्ध बिडकीन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत प्रतिबंधित गुटखा-तंबाखूसह सुमारे ५ लाख रुपयांची स्कॉर्पिओ जीप, असा एकूण ५ लाख ३९ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.१५ वाजता ज्ञानेश्वर नगर, चितेगाव, ता. पैठण येथे ही कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी अस्लम हनीफ पठाण (वय ३५, रा. भारत नगर, बिडकीन, ता. पैठण) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या ताब्यातील पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा स्कॉर्पिओ (एमएच-२०-ईई-२९५०) वाहनातून शासनाने प्रतिबंधित केलेला हिरा पान मसाला, राजनिवास पान मसाला, रॉयल ७१७ तंबाखू आणि ZN-01 जर्दा तंबाखू असा साठा आढळून आला.
जप्त मुद्देमालामध्ये हिरा पान मसाला ₹१२,८४०, रॉयल ७१७ तंबाखू ₹६,७८०, राजनिवास पान मसाला ₹१५,००० आणि ZN-01 जर्दा तंबाखू ₹५,०००, तसेच अंदाजे ₹५ लाख किमतीचे स्कॉर्पिओ वाहन यांचा समावेश आहे.
या प्रकरणी पोहेकॉ. सचिन प्रभाकर सोनार (वय ४७), स्थानिक गुन्हे शाखा, छत्रपती संभाजीनगर यांनी फिर्याद दिली. बिडकीन पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५२०/२०२६, कलम १२३, २२३, २७५ भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ चे कलम ५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोहेकॉ. यु. बी. दंडगव्हाळ यांनी केली असून, पुढील तपास पोउपनि. एम. ई. पाटील करीत आहेत.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
बिडकीन पोलिसांची कारवाई; ५.३९ लाखांचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूसाठा जप्त
Related Posts
Add A Comment

