शिल्लेगाव येथे गुन्हा रजि. नं. 392/2026, कलम 303(2) BNS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्यातील फिर्यादी मयुरी योगेश पवार, वय 24 वर्षे, व्यवसाय शेती, रा. कनकोरी, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर यांनी दिनांक 15/08/2026 रोजी दुपारी 12.15 वा. गवळीशिवरा, ता. गंगापूर येथे गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील अंदाजे रु.45,000/- किंमतीचे सोन्याचे दोन पदरी मंगळसूत्र चोरी केल्याबाबत तक्रार दिली होती.
सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना आरोपींचा शोध घेऊन 1) आरती राजेंद्र भोसले व 2) सुनिता प्रेम चव्हाण, दोन्ही रा. राजनगर, मुकुंदवाडी, छत्रपती संभाजीनगर यांना ताब्यात घेण्यात आले आहे. प्राथमिक तपासामध्ये सदर आरोपी महिलांनी गवळीशिवरा येथे शनिवारी गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या अंगावरील दागिने चोरी केल्याचे निष्पन्न झाले व सदर महिला आरोपीतांकडून चोरी गेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला
सदर कारवाई मा पोलीस अधीक्षक सो, मा अपर पोलीस अधीक्षक सो, मा SDPO सो गंगापूर, पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून स फौ गोंडे हे पुढील तपास करीत आहेत.
पोलीस ठाणे शिल्लेगाव
जि. छत्रपती संभाजीनगर

