Close Menu
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

वसीम शेख यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव

September 8, 2026

मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीत बिघाड; ११व्या दिवशी सात किलो वजन घटले

September 8, 2026

फुलंब्री तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Facebook X (Twitter) Instagram
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Subscribe
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Home»छत्रपती संभाजीनगर»खुलताबादमध्ये घरगुती गॅस सिलेंडरमधून वाहनांमध्ये अवैध गॅस रिफिलिंगचा पर्दाफाश; १३ सिलेंडरसह १.८४ लाखांचा मुद्देमाल जप्त
छत्रपती संभाजीनगर

खुलताबादमध्ये घरगुती गॅस सिलेंडरमधून वाहनांमध्ये अवैध गॅस रिफिलिंगचा पर्दाफाश; १३ सिलेंडरसह १.८४ लाखांचा मुद्देमाल जप्त

Maharashtranewstimes2026@gmail.comBy Maharashtranewstimes2026@gmail.comAugust 23, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

ऑटोरिक्षासह इलेक्ट्रिक मोटार, वजनकाटा व घरगुती गॅस सिलेंडर ताब्यात; नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या बेकायदेशीर रिफिलिंगविरुद्ध पोलिसांची धडक कारवाई

घरगुती वापरासाठी वितरित करण्यात येणाऱ्या एलपीजी गॅस सिलेंडरमधून ऑटोरिक्षा व इतर वाहनांमध्ये व्यावसायिक वापरासाठी बेकायदेशीररीत्या गॅस रिफिलिंग करण्याचा प्रकार खुलताबाद शहरातील जुने बस स्थानक परिसरात उघडकीस आला आहे. सहायक पोलीस अधीक्षक, कन्नड उपविभाग, श्रीमती अपराजिता अग्निहोत्री यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या कारवाईत १३ घरगुती गॅस सिलेंडर, ऑटोरिक्षा, गॅस रिफिलिंगसाठी वापरण्यात येणारी इलेक्ट्रिक मोटार व इलेक्ट्रिक वजनकाटा असा एकूण सुमारे १ लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दिनांक २० ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सहायक पोलीस अधीक्षक श्रीमती अपराजिता अग्निहोत्री यांना खुलताबाद शहरातील जुने बस स्थानक परिसरात घरगुती वापरासाठी असलेल्या एलपीजी गॅस सिलेंडरमधून वाहनांमध्ये बेकायदेशीररीत्या गॅस रिफिलिंग केले जात असल्याची माहिती मिळाली. माहितीची खातरजमा करून मा. प्रकाश जाधव, पोलीस अधीक्षक, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण तसेच मा. प्रशांत स्वामी, अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली कन्नड उपविभागीय पोलीस कार्यालयाचे पथक व खुलताबाद पोलीस ठाण्याचे पथक यांना सोबत घेऊन नियोजनबद्ध कारवाई करण्यात आली.

जुने बस स्थानक परिसरात शेख रऊफ हा घरगुती वापरासाठी असलेल्या गॅस सिलेंडरमधून ऑटोरिक्षा व इतर वाहनांमध्ये व्यावसायिक वापरासाठी गॅस रिफिलिंग करत असल्याचे आढळून आले. याठिकाणी घरगुती गॅस सिलेंडर, रिफिलिंगसाठी वापरण्यात येणारी यंत्रणा तसेच वजनकाटा आढळून आल्याने पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सदर साहित्य व ऑटोरिक्षा ताब्यात घेतली.

अनधिकृत गॅस विक्री किंवा रिफिलिंगपुरता मर्यादित नसून सार्वजनिक सुरक्षिततेशी निगडित गंभीर बाब असल्याने पोलिसांनी त्याची गांभीर्याने दखल घेतली आहे.

या कारवाईदरम्यान गॅस रिफिलिंगसाठी वापरण्यात येणारी इलेक्ट्रिक मोटार व इलेक्ट्रिक वजनकाटा पोलिसांच्या निदर्शनास आला. यावरून घरगुती सिलेंडरमधील गॅस वाहनांमध्ये हस्तांतरित करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था वापरली जात असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी ही संपूर्ण यंत्रणा तसेच संबंधित वाहन व गॅस सिलेंडर जप्त करून पुढील तपास सुरू केला आहे.

या कारवाईत १३ घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले असून, त्यामध्ये घरगुती वापरासाठी उपलब्ध असलेल्या गॅसचा व्यावसायिक कारणासाठी अनधिकृत वापर होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे १ लाख ८४ हजार रुपये आहे.

या प्रकरणी खुलताबाद पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता, जीवनावश्यक वस्तू व सेवा अधिनियम तसेच इतर लागू कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई सहायक पोलीस अधीक्षक श्रीमती अपराजिता अग्निहोत्री यांच्या नेतृत्वाखाली कन्नड उपविभागीय पोलीस कार्यालयाचे वाचक पोउपनि अजय पानपाटील, अंमलदार मयुर वाळुंजकर, अमोल गायकवाड, संदिप जोनवाल, योगिता पाटील तसेच खुलताबाद पोलीस ठाण्याचे पो.नि. प्रशांत महाजन, सपोनि संभाजी वडते, पोउपनि राजेश पाटील, पो.ह. ११८९ जाकीर शेख, पोह. १०२ किशोर गवळी, पो.ह. १३६७ सिद्धार्थ सदावर्ते, मपोह १२०४ सोनाली कुंदे, चा.पो.ह. १४०५ अनिल जाधव व पो.कॉ. १७१७ योगेश क्षिरसागर यांनी केली आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Maharashtranewstimes2026@gmail.com
  • Website
  • Facebook
  • Instagram

Related Posts

वसीम शेख यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव

September 8, 2026

मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीत बिघाड; ११व्या दिवशी सात किलो वजन घटले

September 8, 2026

फुलंब्री तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन

September 8, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजीनगर

वसीम शेख यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव

By Maharashtranewstimes2026@gmail.comSeptember 8, 20260
Spread the love

कन्नड:- शमाबी बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व आयशा कोचिंग क्लासेसचे संचालक वसीम शेख यांनी शैक्षणिक,…

मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीत बिघाड; ११व्या दिवशी सात किलो वजन घटले

September 8, 2026

फुलंब्री तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन

September 8, 2026

विशेष लेख : विद्यार्थी हिंसक का होतो?

September 3, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Editors Picks
Top Reviews
Advertisement
Demo
maharashtranewstimes.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo YouTube
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
About Us
Maharashtra News Times हे एक विश्वासार्ह डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही वाचकांना अचूक, निष्पक्ष आणि ताज्या बातम्या वेळेवर देण्यावर भर देतो.
राजकारण, समाज, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि स्थानिक घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
वाचकांचा विश्वास जपणे आणि सत्य माहिती पोहोचवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
डिजिटल माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हीच आमची बांधिलकी आहे.

Contact Us
संपादक: दिनेश गायके
मोबाईल: +91 99232 37970
ईमेल: Maharashtranewstimes2026@gmail.com
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.