फुलंब्री : (जिल्हा एस के शेख प्रतिनिधी) चव्हाण परिवारातील अतुल चव्हाण व आमदार अनुराधाताई चव्हाण यांनी सोनू गवळी यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. इतिहास विषयात पीएच.डी. पदवी संपादन करून त्यांनी चव्हाण परिवारासह गावाच्या शैक्षणिक क्षेत्रात मानाचा तुरा रोवला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मान्यताप्राप्त विद्याशाखेंतर्गत इतिहास विषयात सोनू बन गवळी-चव्हाण यांना पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. विवेकानंद कला, सरदार दलिपसिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथील इतिहास विषयाच्या संशोधन केंद्रांतर्गत तसेच इंद्रराज महाविद्यालय, सिल्लोड येथील प्रा. डॉ. व्यंकटेश लांब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संशोधन पूर्ण केले.
सोनू गवळी यांनी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे विचार आणि कार्य : एक चिकित्सक अभ्यास’ या विषयावर शोधप्रबंध सादर केला. या संशोधनातून उपाध्याय यांच्या जीवन, विचार आणि कार्याचा चिकित्सक अभ्यास करण्यात आला आहे.
गावातील प्रतिष्ठित चव्हाण परिवारातील सूनबाई या नात्याने सोनू गवळी यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल तेजराव पाटील चव्हाण, देवनाथ बापू, प्रशांत चव्हाण, श्रीकांत चव्हाण, सचिन चव्हाण, बाळू सोनवणे, शरद चव्हाण, सुमित चव्हाण, किशोर तात्या चव्हाण, अनिल चव्हाण, अमोल सोनवणे यांच्यासह इतर मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी मान्यवरांनी सोनू गवळी यांच्या पुढील शैक्षणिक, सामाजिक आणि संशोधन क्षेत्रातील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या यशामुळे चव्हाण परिवारासह गावाच्या शैक्षणिक क्षेत्रातही अभिमानाची भर पडली आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
सोनू गवळी यांना इतिहास विषयात पीएच.डी. पदवी; चव्हाण परिवाराकडून अभिनंदन
Related Posts
Add A Comment

