छत्रपती संभाजीनगर, दि.१८ : जन्मापासून ते मरेपर्यंत माणुस औपचारिक, अनौपचारिक शिक्षण घेतच असतो. माणसाच्या सर्वांगीण विकासासोबतच विचारप्रवण व्यक्ती घडविणे हेच शिक्षणाचे ध्येय आहे, असे प्रतिपादन जीएमएनआरडीचे माजी संचालक, अर्थशास्त्रज्ञ प्राचार्य डॉ.सर्जेराव ठोंबरे यांनी केले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागाची प्राचार्य व कार्यक्रमाधिकारी कार्यशाळा मंगळवारी (दि.१८) घेण्यात अली. यावेळी प्रकुलगुरु डॉ.प्रवीण वक्ते, कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर, विभागाचे संचालक डॉ.अश्विन रांजणीकर, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.योगिता होके पाटील, डॉ.आनंद वाघ आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यशाळेत चार जिल्हयातून १२० प्राचार्य, कार्यक्रमाधिकारी सहभागी झाले. यावेळी प्राचार्य डॉ.सर्जेराव ठोंबरे म्हणाले, भारतीय ज्ञान परंपरा ही अत्यंत उदात्त आणि प्राचीन आहे. जागतिक बंधुभाव हा या परंपरेचा आत्मा आहे. शिक्षणाने माणूस हा अधिक समाजशील व उत्तरदायी बनत असतो. आजीवन अध्ययन विभागच्या माध्यमातून ग्रामीण भागात शाश्वत विकास व सामाजिक परिवर्तनाचे कार्य घडत आहे, असेही डॉ.ठोंबरे म्हणाजे. तर आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे युनीट असलेल्या महाविद्यालयांनी अधिक प्रभावीपणे व नाविण्यपूर्ण उपक्रम राबवावेत, अशी अपेक्षा डॉ.प्रशांत अमृतकर यांनी व्यक्त केली. अध्यक्षीय समारोपात प्रकुलगुरु डॉ.प्रवीण वक्ते म्हणाजे, पारंपारिक शिक्षणासोबतच सामाजिक उत्तरदायीत्व म्हणून महाविद्यालयीन आजीवन अध्ययन विभागाचे नाविण्यपूर्ण अभ्यासक्रम राबवावेत. चार जिल्हयातून मिळून किमान १० हजार विद्यार्थी या ६० महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमांना प्रवेशित करावेत, असे आवाहनही त्यांनी केले. चार जिल्हयातील ६० महाविद्यालयात विभागाचे युनिट असून अनेक अभ्यासक्रम, उपक्रम राबविण्यात येत असल्याचे डॉ.अश्विन रांजणीकर यांनी प्रास्ताविकात सांगितले.
१२ पारितोषिकांचे वितरण
या कार्यक्रमात आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्यावतीने उत्कृष्ट महाविद्यालय, आदर्श प्राचार्य व कार्यक्रमाधिकारी अशा १२ पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. बीड, जालना, धाराशिव व छत्रपती संभाजीनगर या चारही जिल्हयातून प्रत्येकी तीन पारितोषिकांचे वितरण यावेळी करण्यात आले. यामध्ये उत्कृष्ट विस्तार केंद्र पुरस्कार २०२५-२६ १. चिश्तिया महाविद्यालय, खुलताबाद, जि.छत्रपती संभाजीनगर, श्रीमती दानकुंवर महिला महाविद्यालय, जालना, ३. श्री.शंकरराव पाटील महाविद्यालय, भूम, जि.धाराशिव, ४. श्री.सिध्देश्वर महाविद्यालय, माजलगाव, जि.बीड, उत्कृष्ट विस्तार केंद्र प्राचार्य पुरस्कार १. डॉ.आसिफ झकेरिया, २. डॉ.जितेंद्र अहिरराव, डॉ.अनुराधा जगदाळे, ४. डॉ.मुकूंद देवर्षी, उत्कृष्ट विस्तार केंद्र कार्यक्रम अधिकारी पुरस्कार २०२५-२६ १. डॉ.मोहम्मद अली, २. प्रा.पार्वती देशमुख, ३. डॉ.श्यामसुंदर आगे, डॉ.नितीन पडवळ ४. प्रा.सुरेश बनसोडे यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. प्रारंभी वार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. प्रा.पिराजी कमले यांनी सूत्रसंचालन तर डॉ.आनंद वाघ यांनी आभार मानले. कार्यशाळेसाठी शिवाजी मोहिते, शेख खैराती, शेख साजीद आदींनी प्रयत्न केले.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
चार उत्कृष्ट महाविद्यालयांचा गौरव विचार प्रवण माणूस घडविणे हेच शिक्षणाचे ध्येय
Related Posts
Add A Comment

