फुलंब्री तालुक्यातील खामगाव (गोरक्ष) येथे महसूल विभागाने अवैध वाळू वाहतुकीविरोधात कारवाई करत एक मिनी हायवा पकडला.
फुलंब्री तहसील महसूल विभागाच्या पथकाने ही कारवाई केली असून, अवैध वाळू वाहतूक करताना आढळलेले वाहन ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी मिनी फुलंब्री तहसील कार्यालयात नेण्यात आला आहे.
महसूल विभागाच्या या कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. वाहनावर नियमानुसार दंडात्मक कारवाई होणार असल्याची माहिती आहे.

