१७ जुगारी ताब्यात; लॉजमालकासह १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
वैजापूर : वैजापूर शहर व परिसरातील अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी कारवाईची मोहीम सुरू केली असून, जुना नागपूर-मुंबई रोडवरील निसर्ग लॉजमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत पत्त्यांवर पैसे लावून जुगार खेळणाऱ्या १७ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, लॉजमालकासह एकूण १८ जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल, दुचाकी व चारचाकी वाहनांसह एकूण ३४ लाख ७० हजार ३७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
१७ ऑगस्ट रोजी वैजापूर पोलीस ठाण्याचे परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक तथा प्रभारी अधिकारी विनय सोनावणे हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना जुना नागपूर-मुंबई रोडवरील धनश्री हॉटेलच्या बारलगत असलेल्या निसर्ग लॉजमध्ये काही जण पत्त्यांवर पैसे लावून जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन आवश्यक परवानगी घेतल्यानंतर पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला.
पोलिसांच्या पथकाने निसर्ग लॉजमध्ये छापा टाकला असता १७ जण गोल रिंगण करून पत्त्यांवर पैसे लावून जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी सर्वांना जागीच ताब्यात घेतले. पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून २१ हजार ३७० रुपये रोख रक्कम, १२ मोबाईल हँडसेट, ८ दुचाकी आणि २ चारचाकी वाहने असा एकूण ३४ लाख ७० हजार ३७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कारवाईत नितेश कऱ्हाळे, सुनील पेहरकर, गणेश राजपूत, आशीतोष बोडखे, विश्वनाथ धामे, प्रथमेश उचीत, हंसराज जगताप, रविंद्र रारे, करण जाधव, पुष्पक जाधव, रविंद्र लुटे, कुणाल राजपूत, हर्षद राजपूत, सुरज मेहरे, कुणाल अशोक राजपूत, करण भगवानसिंग राजपूत आणि आकाश पेहरकर या १७ जणांना ताब्यात घेण्यात आले.
दरम्यान, निसर्ग लॉजमध्ये जुगाराचा अड्डा चालविण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्याने लॉजमालक दौलत गायकवाड, रा. रामवाडी, ता. वैजापूर यांच्याविरुद्धही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५३३/२०२६, कलम ४, ५ व १२(अ), महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी आणि वैजापूर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक तथा वैजापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विनय सोनावणे, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक आर. आर. जाधव, पोलीस अंमलदार अविनाश भारकर, गणेश गोरक्ष, शिवकांत भुरे, प्रशांत गिते, प्रल्हाद जटाळे, अरवाज चौधरी, सतित तायडे तसेच होमगार्ड यांनी कारवाईत सहभाग घेतला.
छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांकडून अवैध जुगार तसेच इतर अवैध धंद्यांविरोधात सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. अवैध धंद्यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहकार्य करणाऱ्या व्यक्तींविरुद्धही कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. नागरिकांनी आपल्या परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांची माहिती पोलिसांना देऊन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
वैजापूर पोलिसांची अवैध जुगार अड्ड्यावर धाड; ३४ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त
Related Posts
Add A Comment

