Close Menu
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

वसीम शेख यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव

September 8, 2026

मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीत बिघाड; ११व्या दिवशी सात किलो वजन घटले

September 8, 2026

फुलंब्री तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Facebook X (Twitter) Instagram
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Subscribe
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Home»छत्रपती संभाजीनगर»फुलंब्री मॅरेथॉनमध्ये ८५३ खेळाडूंचा सहभाग; सिद्धनाथ जगताप व मनीषा पाडवी विजयी
छत्रपती संभाजीनगर

फुलंब्री मॅरेथॉनमध्ये ८५३ खेळाडूंचा सहभाग; सिद्धनाथ जगताप व मनीषा पाडवी विजयी

Maharashtranewstimes2026@gmail.comBy Maharashtranewstimes2026@gmail.comAugust 19, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

फुलंब्री : श्री संत सावता माळी ग्रामीण महाविद्यालय, फुलंब्री आणि संत सावता गुरुकुल यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाळ उपाध्याय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा राजस्थान राज्याचे महामहिम राज्यपाल हरिभाऊ बागडे नाना यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मॅरेथॉन (मिनीथॉन) स्पर्धेचे आयोजन १७ ऑगस्ट २०२६ रोजी फुलंब्री येथे करण्यात आले. या स्पर्धेला खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून विविध जिल्ह्यांमधून तब्बल ८५३ खेळाडूंनी सहभाग नोंदविला.
स्पर्धेत कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, नंदुरबार, नाशिक, शिरपूर, अकोला, बुलढाणा, जालना, अंबड, रत्नागिरी आणि छत्रपती संभाजीनगर आदी जिल्ह्यांतील ६२३ मुले आणि २३० मुली सहभागी झाल्या. याशिवाय सात पोलीस अकॅडमींनीही स्पर्धेत सहभाग नोंदविला. त्यामुळे फुलंब्रीच्या क्रीडा वातावरणात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
स्पर्धेचे उद्घाटन फुलंब्री विधानसभा मतदारसंघाच्या आमदार अनुराधाताई चव्हाण आणि विधानपरिषद सदस्य आमदार सुहासभाऊ सिरसाठ यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव निवृत्ती पाटील गावंडे होते. यावेळी संस्थेचे पालक संचालक प्राचार्य प्रदीप जबदे, फुलंब्री नगरपरिषदेचे गटनेते तथा नगरसेवक योगेश मिसाळ, नगरसेवक गजानन नागरे, वाल्मिक जाधव, डॉ. श्रीनिवास मोतियेले, डॉ. विलास तांगडे, डॉ. लक्ष्मण जाधव यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.
५ किलोमीटर मुलांच्या गटात सातारा येथील सिद्धनाथ जगताप याने प्रथम क्रमांक पटकावला. सांगलीच्या योगेश पाडुळे याने द्वितीय, तर बीडच्या राहुल खरात याने तृतीय क्रमांक मिळविला. मुलींच्या ५ किलोमीटर गटात नंदुरबारच्या मनीषा पाडवीने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला. छत्रपती संभाजीनगरच्या सोनाली मातनेने द्वितीय, तर नाशिकच्या भावना चव्हाणने तृतीय क्रमांक मिळविला.
३ किलोमीटर मुलांच्या गटात छत्रपती संभाजीनगरच्या अभिषेक गुळविणेने प्रथम, बुलढाण्याच्या अभिषेक रोकडेने द्वितीय, तर पैठणच्या महेश चव्हाणने तृतीय क्रमांक मिळविला. मुलींच्या ३ किलोमीटर गटात वैजापूरच्या आकांक्षा नरवडेने प्रथम क्रमांक पटकावला. छत्रपती संभाजीनगरच्या तेजस्विनी मस्केने द्वितीय, तर वैजापूरच्या गीता आगवणेने तृतीय क्रमांक मिळविला.
स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षीस वितरण आमदार सुहास सिरसाठ, डॉ. बाप्पासाहेब मस्के, डॉ. भुजंग डावकर, डॉ. प्रशांत तौर, सुरेश मिरकर तसेच फुलंब्री पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बारहाते यांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. आर. टकले, समितीचे सचिव डॉ. संदीप जगताप, मुख्याध्यापक अप्पासाहेब चव्हाण, कल्पना उरणकर, डॉ. गणेश कुलकर्णी, डॉ. विजय पांडे, डॉ. नितीन माळेगावकर, डॉ. संजीवकुमार पांचाळ, डॉ. रामकिसन लोमटे, डॉ. महेश थोरात, डॉ. सुरेश मंढे, डॉ. मंजुषा नळगीरकर, डॉ. राजर्षी पवार, प्रा. दत्तात्रय येडले, प्रेम चव्हाण, बाबासाहेब दाभाडे, कृष्णा आढाव, प्रशांत मिसाळ, गंगावणे, रेखा बागडे आदींनी परिश्रम घेतले. ८५३ खेळाडूंच्या सहभागामुळे ही स्पर्धा फुलंब्रीच्या क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय उपक्रम ठरली.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Maharashtranewstimes2026@gmail.com
  • Website
  • Facebook
  • Instagram

Related Posts

वसीम शेख यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव

September 8, 2026

मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीत बिघाड; ११व्या दिवशी सात किलो वजन घटले

September 8, 2026

फुलंब्री तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन

September 8, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजीनगर

वसीम शेख यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव

By Maharashtranewstimes2026@gmail.comSeptember 8, 20260
Spread the love

कन्नड:- शमाबी बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व आयशा कोचिंग क्लासेसचे संचालक वसीम शेख यांनी शैक्षणिक,…

मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीत बिघाड; ११व्या दिवशी सात किलो वजन घटले

September 8, 2026

फुलंब्री तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन

September 8, 2026

विशेष लेख : विद्यार्थी हिंसक का होतो?

September 3, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Editors Picks
Top Reviews
Advertisement
Demo
maharashtranewstimes.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo YouTube
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
About Us
Maharashtra News Times हे एक विश्वासार्ह डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही वाचकांना अचूक, निष्पक्ष आणि ताज्या बातम्या वेळेवर देण्यावर भर देतो.
राजकारण, समाज, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि स्थानिक घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
वाचकांचा विश्वास जपणे आणि सत्य माहिती पोहोचवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
डिजिटल माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हीच आमची बांधिलकी आहे.

Contact Us
संपादक: दिनेश गायके
मोबाईल: +91 99232 37970
ईमेल: Maharashtranewstimes2026@gmail.com
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.