रेणुका माता मंदिरामागे, हडको, छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी तथा प्रतिष्ठित व्यापारी रामलीला ज्वेलर्सचे संचालक स्व. गोकुळ रा. विसपुते (वय ४७ वर्षे) यांचे बुधवार, दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांच्यावर सौभाग्य चौक, एन-११ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, पुतणे, भाऊ-भावजई, बहीण-मेव्हणे असा परिवार आहे.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि विसपुते परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. भावपूर्ण श्रद्धांजली!



