वारेगाव : स्वातंत्र्यदिनाच्या पावन पर्वाचे औचित्य साधून वारेगाव ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल श्री. अनिल भैया बोरसे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. गावाच्या विकासासाठी तसेच शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि ग्रामीण भागाच्या प्रश्नांसाठी त्यांच्या माध्यमातून प्रभावीपणे काम होईल, अशी अपेक्षा यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
सत्कार समारंभास वारेगाव येथील विविध क्षेत्रातील मान्यवर, ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या या सत्कारामुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
ग्रामस्थांनी दिलेल्या सन्मानाबद्दल अनिल भैया बोरसे यांनी आभार व्यक्त करताना गावाच्या विकासासाठी सदैव सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली.
जय हिंद! जय भारत!
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
स्वातंत्र्यदिनाच्या पावन पर्वावर अनिल भैया बोरसे यांचा वारेगाव ग्रामस्थांच्या वतीने सत्कार
Related Posts
Add A Comment

