फुलंब्री दिनांक १५ ऑगस्ट २०२६
रोजी श्री संत सावता माळी ग्रामीण महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रोफेसर डॉ. रामकिशन लोमटे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघांचे अध्यक्ष, श्री अनिल मिसाळ, डॉ. मंदार पाराश्वर उपस्थित होते. तर अध्यक्ष म्हणून माहाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. एस. आर. टकले उपस्थित होते.
बोलत असताना डॉ. लोमटे म्हणाले की, आपल्या स्वातंतत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिले तेव्हा कुठे आज आपण स्वाभिमानाने वावरू शकतो. या मिळालेल्या स्वातंत्र्याचा सदुपयोग आपण सर्वांनी करायला हवा. असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने प्रोफेसर डॉ. दत्तात्रय येडले यांनी उपस्थितांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. याबरोबरच माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
अध्यक्षीय समारोप महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. एस. आर. टकले यांनी केला.
या स्वातंत्र्य दिन सोहळ्यासाठी महाविद्यालयातील प्रोफेसर डॉ.पांडुरंग कल्याणकर, प्रोफेसर डॉ. राजश्री पवार, प्रोफेसर डॉ. मंजुषा नळगीरकर, प्रोफेसर डॉ. सुरेश मुंढे, प्रोफेसर डॉ. संजीवकुमार पांचाळ,प्रोफेसर डॉ.गणेश कुलकर्णी, डॉ. संदीप जगताप, प्रोफेसर डॉ. महेश थोरात, प्रा.डॉ. अंभोरे, श्री प्रेम चव्हाण, श्री बाबासाहेब दाभाडे, श्री विनोद तुपे, श्री रत्नाकर जाधव, श्री रमेश जगधने, श्री जयराम जाधव व अन्य माजी विद्यार्थी यांची उपस्थिती होती.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
श्री संत सावता माळी महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
Related Posts
Add A Comment

