किनगाव : (एस के शेख प्रतिनिधी). जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, किनगाव येथे स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेच्या विकासासाठी सातत्याने अमूल्य योगदान देणारे आदरणीय अतुल चव्हाण यांच्या शुभहस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.
अतुल चव्हाण यांच्या सहकार्यामुळे व योगदानामुळे शाळेच्या विकासाला निश्चितच प्रेरणा आणि बळ मिळत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. ध्वजारोहणानंतर उपस्थित मान्यवर, पालक, शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, भाषणे तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण शाळेचा परिसर देशभक्तीच्या वातावरणाने भारावून गेला होता.
शाळेच्या प्रगतीसाठी सदैव तत्पर राहून सहकार्य करणारे अतुल काका चव्हाण यांचे शाळा प्रशासन, शिक्षक व पालकांकडून मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
जय हिंद! जय भारत! वंदे मातरम्!
— महाराष्ट्र न्यूज टाइम्स

