किनगाव : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, किनगाव येथे विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून आवश्यकतेनुसार औषधांचे वाटप करण्यात आले.
यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे अधिकारी तसेच जिल्हा निवासी आरोग्य अधिकारी प्रशांत बडे, जिल्हा पर्यवेक्षक कार्यक्रम अधिकारी विकास मेश्राम, फुलंब्री तालुका आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी सुरेश ताठे, डॉ. फरीन सय्यद, गवळी सिस्टर, वाणी सिस्टर यांनी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली. विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत आवश्यक मार्गदर्शनही करण्यात आले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका उत्कर्षा देशमुख, उज्वला कोंडके, जयश्री बागुल, सुवर्णा कांबळे यांच्यासह शिक्षकवर्गाने सहकार्य केले. यावेळी शालेय समितीचे सदस्य, पालकवर्ग तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.
विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम राहावे आणि त्यांना वेळेवर आरोग्यविषयक सेवा मिळावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला पालक व विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
प्रतिनिधी : एस. के. शेख



