देशभरातील कारागीर, महिला उद्योजिका, हस्तकला व स्वदेशी उत्पादनांचा अनोखा संगम; सागर रिसॉर्ट्स येथे १६ ऑगस्टपर्यंत आयोजन
छत्रपती संभाजीनगर, दि. १० (विमाका) : भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या सहकार्याने ‘शिखाज कारागीरी’ संस्थेच्या संयुक्त विद्यमाने **‘स्वदेश फॅशन व लाईफस्टाईल एक्स्पो २०२६’**चे आयोजन १४ ते १६ ऑगस्टदरम्यान सागर रिसॉर्ट्स येथे करण्यात आले आहे.
देशभरातील १०० हून अधिक पुरस्कारप्राप्त कारागीर, एमएसएमई उद्योग, स्टार्टअप्स, महिला उद्योजिका, हातमाग व हस्तकला उत्पादक, ‘वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट’ (ODOP) उपक्रमातील उद्योजक आणि विविध लाईफस्टाईल ब्रँड्स या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. साड्या, ड्रेस मटेरियल, एथनिक वेअर, ज्वेलरी, बॅग्स, हस्तकला, होम डेकोर, हातमाग आणि पर्यावरणपूरक उत्पादनांसह विविध स्वदेशी वस्तू येथे उपलब्ध असतील.
ट्रायफेड, खादी व ग्रामोद्योग आयोग आणि नॅशनल ज्यूट बोर्ड यांसह विविध शासकीय संस्थांचे सहकार्य या प्रदर्शनाला लाभले आहे. पारंपरिक भारतीय कारागिरीला आधुनिक बाजारपेठ उपलब्ध करून देणे, कारागीर व महिला उद्योजकांना थेट ग्राहकांशी जोडणे आणि स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देणे हा प्रदर्शनाचा प्रमुख उद्देश आहे.
‘आत्मनिर्भर भारत’, ‘व्होकल फॉर लोकल’ आणि ‘मेक इन इंडिया’ या संकल्पनांना प्रत्यक्ष कृतीची जोड देणाऱ्या या स्वदेशी महोत्सवाला मराठवाड्यातील नागरिकांनी कुटुंबीयांसह मोठ्या संख्येने भेट देऊन कारागीर व उद्योजकांच्या उत्पादनांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
छत्रपती संभाजीनगरात १४ ऑगस्टपासून ‘स्वदेश फॅशन व लाईफस्टाईल एक्स्पो २०२६’
Related Posts
Add A Comment

