छत्रपती संभाजीनगर शहरातील रस्त्यांवरील खड्डे पावसाळ्यात नागरिकांसाठी मोठा धोका ठरत आहेत. मध्यवर्ती बसस्थानकासमोरील धोकादायक खड्ड्याबाबत अनेक दिवस महानगरपालिकेकडे पाठपुरावा करूनही कारवाई न झाल्याने अखेर वाहतूक पोलिसांनी पुढाकार घेतला.
वाहतूक पोलीस निरीक्षक मंगेश जगताप यांनी सामाजिक कार्यकर्ते रशीद शेख यांच्या सहकार्याने स्वतः खड्ड्यात खडी टाकून तात्पुरती दुरुस्ती केली. शहरात खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटना घडत असताना, प्रशासनाच्या कारवाईची वाट न पाहता नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पुढाकार घेणाऱ्या अशा सकारात्मक विचारांच्या व्यक्तींचे निश्चितच कौतुक आणि सत्कार व्हायला हवा.
वाद घालण्यापेक्षा अडचण सोडविण्यासाठी पुढे येणारी माणसेच शहराला खऱ्या अर्थाने पुढे नेतात.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
खड्ड्याची जबाबदारी मनपाची, पण माणुसकीची जबाबदारी पोलिसांनी निभावली!
Related Posts
Add A Comment

