आपतकालीन जीवनरक्षक प्रथमोपचार कार्यशाळा संपन्न
छत्रपती संभाजीनगर, दि. ७ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रातर्फे इंडियन मेडिकल असोसिएशन शाखेच्या सहकार्याने आयोजित ‘कम्प्रेशन-ओन्ली लाईफ सपोर्ट (COLS)’ या विषयावरील आपत्कालीन जीवनरक्षक प्रथमोपचार कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा इंडियन मेडिकल असोसिएशन छत्रपती संभाजीनगर शाखा व आरोग्य केंद्राच्यावतीने शुक्रवारी (दि.सात) आपत्कालीन जीवनरक्षक प्रथमोचार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी यांच्यासाठी ’आपात्कालीन जीवनरक्षक प्रथमोपचार कार्यशाळा (कम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट) सकाळी ११ ते १ यावेळेत महात्मा फुले सभागृहात घेण्यात आली. कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली ’डीएसआर’ उपक्रमातंर्गत हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यशाळेत डॉ.मंगेश तांदळे, डॉ.स्वाती पांडे, डॉ.मंगेश तांदळे, डॉ.सुजाता सोमाणी, डॉ.माधुरी पाटील, डॉ.प्रार्थना शहा आदी तज्ज्ञ डॉक्टर्स मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे उद्घाटन विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ.कैलास अंभुरे, परीक्षा मंडळ संचालक डॉ.बी.एन.डोळे, उपकुलसचिव डॉ.संजय कवडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.आनंद सोमवशी यांची मंचावर उपस्थिती होती. डॉ.कैलास अंभुरे यांनी उद्घाटनपर भाषण केले. अलीकडच्या धकाधकीच्या काळात मानसिक व शारिरीक ताणतणाव वाढले असून संतुलित आहार, नियमित व्यायाम व सहा महिन्यांनी आरोग्य तपासणी गरजेची आहे, असे ते म्हणाले. यावेळी डॉ.मंगेश तांदळे म्हणाले, वैद्यकीय भाषेत अपघातानंतरचा पहिला तास हा ‘गोल्डन अवर’ (Golden Hour) मानला जातो. या पहिल्या काही मिनिटांत जर योग्य उपचार मिळाले, तर रुग्णाचा जीव वाचण्याची शक्यता ८० टक्क्यांनी वाढते. प्रथमोपचार म्हणजे डॉक्टरांसारखे उपचार करणे नव्हे, तर डॉक्टर किंवा रुग्णवाहिका येईपर्यंत रुग्णाची स्थिती अधिक बिघडू न देणे आणि त्याला जिवंत ठेवणे.या कार्यशाळेत तीन मुख्य जीवनरक्षक कौशल्ये शिकवणियात आले. डॉ.आनंद सोमवंशी यांनी प्रास्ताविक केले. डॉ.संजय शिंदे यांनी सूत्रसंचालन तर भगवान फड यांनी आभार मानले. डॉ.आनंद सोमवंशी यांनी प्रास्ताविक केले. डॉ.संजय शिंदे यांनी सूत्रसंचालन तर भगवान फड यांनी आभार मानले. डॉक्टर्स सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (डीएसआर) उपक्रमातंर्गत अध्यक्ष डॉ.विकास देशमुख, सचिव डॉ.प्रशांत दरख व प्रकल्प समन्वयक डॉ.अजिता अन्नछत्रे यांनी केले.कार्यशाळेसाठी डॉ पल्लवी मातकर, पायल जुजरे, स्मिता पाईकराव, निर्मला खरात यांनी प्रयत्न केले.

