’जीएमएनआरडी’ला मिळणार पूर्ववेळ संचालक
छत्रपती संभाजीनगर, दि.०६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ’गोपीनाथराव मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास संस्था’, ’मॉडेल कॉलेज येथे पूर्णवेळ प्राचार्य व संचालक तसेच सहायक प्राध्यापकांची ३० पदे भरण्यात पदे भरण्यात येणार आहेत. तसेच एकत्रित वेतनावर १४१ सहाय्यक प्राध्यापकांची पदी भरण्यात येणार असून सोमवारपासून मुलाखत घेण्यात येणार आहेत, अशी माहिती कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर यांनी दिली.
गेल्या दहा वर्षांपासून गोपीनाथराव मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास संस्था अर्थात ’जीएमआरआरडी’ विद्यापीठ परिसरात कार्यरत आहे. या ठिकाणी चार पदव्यूत्तर अभ्यासक्रमांसह पदविका व प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु आहेत. या ठिकाणी पूर्णवेळ संचालकाचे पद एक लाख रुपये एकत्रित वेतनावर भरण्यात येणार आहे. तसेच सहायक प्राध्यापकांची १२ पदे ३२ हजार रुपये एकत्रित वेतनावर भरण्यात येणार आहेत. तसेच श्रीक्षेत्र पैठण येथील संतपीठात सहाय्यक प्राध्यापकांची आठ पदे भरण्यात येणार आहेत. या ठिकाणी संत साहित्याशी संबधित अभ्यासक्रम सुरु आहेत. विद्यापीठ संचलित मॉडेल कॉलेज घनसावंगी येथे एक लाख रुपये एकत्रित वेतनावर प्राचार्यचे पद भरण्यात येणार आहे. तसेच हिंदी, इंग्रजी, मानसशास्त्र, वाणिज्य, संगणकशास्त्र, जैवरसायनशास्त्र व जैवतंत्रज्ञान या विभागासाठी सहायक प्राध्यापकांची ९ पदे भरण्यात येणार आहेत. ही सर्व पदे एकत्रित वेतनावर असून येत्या १४ऑगस्ट रोजी मुलाखती घेण्यात येणार आहेत. तत्पूर्वी १३ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन आवेदन दाखल करावे लागणार आहेत. संबंधितांनी मूळ कागदपत्रे, अर्जाच्या दोन प्रतीसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर यांनी केले आहे.
१४१ जागांसाठी सोमवारपासून मुलाखती
मुख्य परिसर व धाराशिव उपपरिसरात १४१ सहायक प्राध्यापकांची एकत्रित वेतनावर पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी ३ व ४ ऑगस्ट रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली . १४१ जागांसाठी ४६८ उमेदवारांनी आवेदन दाखल केले. यातील ३९२ जणांनी परीक्षा दिली. युनिकचे संचालक डॉ.प्रवीण यन्नावार व सहका-यांनी ही कॅम्युटर बेस्ड चाचणी यशस्वीपणे घेतली. यातील निवड झालेल्या उमेदवारांच्या १० ते १३ ऑगस्ट दरम्यान मुलाखती घेण्यात येणार आहेत. कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती व्यवस्थापन परिषद कक्षा ही मुलाखत घेणार आहे. १० ते १३ ऑगस्ट या काळात दररोज एका विद्याशाखे अंतर्गत सहायक प्राध्यापकांच्या मुलाखत घेण्यात येतील. यामध्ये अनुक्रमे विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा, मानव्य विद्या, वाणिज्य शास्त्र तर शेवटच्या दिवशी आंतरविद्या शाखेतील मुलाखत घेण्यात येतील.
संबंधित विषयांच्या मुलाखतीदिवशी दिवशी मुळ कागदपत्रासहा सकाळी ९ वाजता महात्मा फुले सभागृहात सर्वांनी उपस्थित रहावे, असे आस्थापना विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे.
___&&&______

