Close Menu
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

वसीम शेख यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव

September 8, 2026

मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीत बिघाड; ११व्या दिवशी सात किलो वजन घटले

September 8, 2026

फुलंब्री तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Facebook X (Twitter) Instagram
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Subscribe
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Home»छत्रपती संभाजीनगर»हस्तकला, हातमाग,स्वदेशी उत्पादनाचे ‘सागर रिसॉर्ट ‘ मध्ये प्रदर्शन
छत्रपती संभाजीनगर

हस्तकला, हातमाग,स्वदेशी उत्पादनाचे ‘सागर रिसॉर्ट ‘ मध्ये प्रदर्शन

Maharashtranewstimes2026@gmail.comBy Maharashtranewstimes2026@gmail.comAugust 9, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

छत्रपती संभाजीनगर दि.८ ऑगस्ट : भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या ( एमएसएमई) सहकार्याने ‘शिखा’ज कारागीरी या संस्थेच्या समन्वयात ‘स्वदेश ‘फॅशन व लाईफस्टाईल एक्सपो 2026 (SWADESHI – Fashion & Lifestyle Expo 2026 )या भव्य हस्तकला मेळाव्याचे आयोजन छत्रपती संभाजीनगरात करण्यात आले आहे.
१४ ते १६ ऑगस्ट २०२६ दरम्यान सागर रिसॉर्ट्स येथे होणाऱ्या या प्रदर्शनात देशभरातील स्वदेशी उत्पादने, हस्तकला, हातमाग, फॅशन आणि लाइफस्टाइल उत्पादनांचे वैविध्य अनुभवण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे.
या प्रदर्शनात १०० हून अधिक पुरस्कारप्राप्त कारागीर, एमएसएमई उद्योग, स्टार्टअप्स, महिला उद्योजिका, हातमाग व हस्तकला उत्पादक, ‘वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट’ उपक्रमातील उद्योजक, सहकारी संस्था तसेच विविध लाइफस्टाइल ब्रँड सहभागी होणार आहेत.ट्रॅक्टर (TRIFED ) खादी आणि ग्रामोद्योग आयोग (KVIC), नॅशनल ज्यूट बोर्ड यांसह केंद्र व राज्य शासनाशी संबंधित संस्थांचेही या उपक्रमाला सहकार्य लाभणार आहे.
भारताच्या विविध प्रांतांतील पारंपरिक कौशल्य आणि आधुनिक उद्योजकतेचा अनोखा संगम या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहे.चोखंदळ ग्राहकांना शैलीदार निवडीसाठी हे प्रदर्शन महत्त्वपूर्ण ठरणार आहे.त्यामुळे मराठवाड्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कारागिरी म्हणजे केवळ एखादी वस्तू तयार करण्याचे कौशल्य नव्हे; तर पिढ्यान्‌पिढ्या जपलेली कला, परंपरा, कल्पकता आणि स्थानिक ज्ञानाचा अमूल्य वारसा होय. अशा देशातील विविध राज्यातील कुशल कारागिरांनी तयार केलेल्या हस्तकला व हातमाग उत्पादनांना थेट बाजारपेठ उपलब्ध करून देणे, एमएसएमई आणि महिला उद्योजकांना प्रोत्साहन देणे तसेच भारतीय स्वदेशी उत्पादनांची व्याप्ती वाढविणे, हा या प्रदर्शनामागील महत्त्वाचा उद्देश आहे.
‘आत्मनिर्भर भारत’, ‘व्होकल फॉर लोकल’ आणि ‘मेक इन इंडिया’च्या संकल्पनांना प्रत्यक्ष कृतीची जोड देणारे हे व्यासपीठ ठरणार आहे.त्यामुळे देशभरातील कारागिरांच्या हस्तकलेला,पारंपारिक कारागिरीला चालना देण्यासाठी एकदा सागर रिसॉर्ट्सला भेट देऊन या मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे प्रदर्शनामुळे विविध भागांतील प्रतिभावान कारागिरांना आपली उत्पादने आणि कौशल्य मोठ्या ग्राहक वर्गासमोर मांडण्याची संधी मिळणार आहे.छत्रपती संभाजीनगरच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक भूमीवर साकारत असलेला हा स्वदेशीचा भव्य उत्सव कारागिरी, उद्योजकता आणि भारतीय परंपरेचे दर्शन घडविणारा ठरणार आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातील कलाकुसर, नावीन्यपूर्ण उत्पादने आणि उद्योजकतेची नवी ऊर्जा एकाच छताखाली अनुभवता येणार असल्याने नागरिकांसाठी हे प्रदर्शन विशेष आकर्षण ठरणार आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Maharashtranewstimes2026@gmail.com
  • Website
  • Facebook
  • Instagram

Related Posts

वसीम शेख यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव

September 8, 2026

मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीत बिघाड; ११व्या दिवशी सात किलो वजन घटले

September 8, 2026

फुलंब्री तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन

September 8, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजीनगर

वसीम शेख यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव

By Maharashtranewstimes2026@gmail.comSeptember 8, 20260
Spread the love

कन्नड:- शमाबी बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व आयशा कोचिंग क्लासेसचे संचालक वसीम शेख यांनी शैक्षणिक,…

मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीत बिघाड; ११व्या दिवशी सात किलो वजन घटले

September 8, 2026

फुलंब्री तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन

September 8, 2026

विशेष लेख : विद्यार्थी हिंसक का होतो?

September 3, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Editors Picks
Top Reviews
Advertisement
Demo
maharashtranewstimes.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo YouTube
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
About Us
Maharashtra News Times हे एक विश्वासार्ह डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही वाचकांना अचूक, निष्पक्ष आणि ताज्या बातम्या वेळेवर देण्यावर भर देतो.
राजकारण, समाज, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि स्थानिक घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
वाचकांचा विश्वास जपणे आणि सत्य माहिती पोहोचवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
डिजिटल माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हीच आमची बांधिलकी आहे.

Contact Us
संपादक: दिनेश गायके
मोबाईल: +91 99232 37970
ईमेल: Maharashtranewstimes2026@gmail.com
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.