छत्रपती संभाजीनगर : पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ३ ते ४ ऑगस्टदरम्यान ग्रामीण पोलिसांनी विशेष ‘ऑल आऊट ऑपरेशन’ राबवून शाळा, महाविद्यालय परिसर, बाजारपेठा व सार्वजनिक ठिकाणी धडक कारवाई केली. या मोहिमेत शाळा व महाविद्यालय परिसरात टवाळखोरी, छेडछाड व रोडरोमिओगिरी करणाऱ्या ३२ जणांवर मुंबई पोलीस अधिनियमाच्या कलम ११० व ११७ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
या विशेष मोहिमेत अवैध दारूविक्रीविरोधात ५५ गुन्हे दाखल करून ५७ आरोपींवर कारवाई करण्यात आली. यात ₹३.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच शाळा-महाविद्यालय परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरुद्ध COTPA कायद्यांतर्गत ५८ गुन्हे दाखल करून ₹१९,६४७ दंड वसूल करण्यात आला.
या संपूर्ण मोहिमेत एकूण ११३ गुन्हे दाखल, १४७ आरोपींवर कारवाई आणि ₹४,१२,३२७ किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी अशा मोहिमा पुढेही सुरू राहतील, असे आवाहन पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी केले आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
‘ऑल आऊट ऑपरेशन’मध्ये ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; रोडरोमिओंसह १४७ जणांवर कारवाई
Related Posts
Add A Comment

