Close Menu
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

वसीम शेख यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव

September 8, 2026

मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीत बिघाड; ११व्या दिवशी सात किलो वजन घटले

September 8, 2026

फुलंब्री तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Facebook X (Twitter) Instagram
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Subscribe
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
maharashtranewstimes.inmaharashtranewstimes.in
Home»छत्रपती संभाजीनगर»युवक महोत्सवाचे वेळापत्रक जाहीर – यजमान महाविद्यालयेही निश्चित
छत्रपती संभाजीनगर

युवक महोत्सवाचे वेळापत्रक जाहीर – यजमान महाविद्यालयेही निश्चित

Maharashtranewstimes2026@gmail.comBy Maharashtranewstimes2026@gmail.comAugust 6, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

छत्रपती संभाजीनगर, दि.०५ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जिल्हानिहाय युवक महोत्सवाचे आयोजन १ ते १२ सप्टेंबर दरम्यान करण्यात आले आहे. चारही महाविद्यालयांचे यजमान संघही निश्चित झाले असून महोत्सवाची जय्यत तयारी सुरु आहे, अशी माहिती विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ.कैलास अंभुरे यांनी दिली.
युवक महोत्सवसंदर्भात यजमान महाविद्यालयाची निवड करण्यासाठी बैठक कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी बैठक घेण्यात आली. व्यवस्थापन परिषद कक्षात झालेल्या या बैठकीस प्र-कलगुरू प्रा. प्रवीण वक्ते, कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर, समिती सदस्य डॉ. योगिता होके पाटील, प्रा.दिलीप महालिंगे, डॉ. दासू वैद्य, डॉ. किशोर शिरसाठ, प्राचार्य डॉ. वैशाली देशमुख, प्राचार्य डॉ सुधाकर जाधव, डॉ. समाधान इंगळे, डॉ. देवराज दराडे
डॉ. संदीप देशमुख, सदस्य सचिव डॉ. कैलास अंभुरे यांची उपस्थिती होती. गेल्या दोन वर्षांपासून युवक महोत्सवाचे जिल्हास्तरीय आयोजन करण्यात येत आहे. यावर्षी कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रत तयार करण्यात आले आहे. या बैठकीत चारही जिल्ह्यात आठ महाविद्यालयांचे प्राचार्य, सांस्कृतिक विभागप्रमुख उपस्थित होते. बैठकीत चर्चा होऊन जिल्हानिहाय महोत्सवासाठी महाविद्यालय व तारिख निश्चित करण्यात आली.
जिल्हानिहाय महाविद्यालय व महोत्सवाच्या तारखा पुढीलप्रमाणे :-
१. धाराशिव – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय, कळंब, ता.कळंब. जि.धाराशिव, १ व २ सप्टेंबर,
२. बीड – पंडित गुरु पार्डीकर महाविद्यालय, सिरसाळा, ता.परळी वैजनाथ, जि.बीड, ४ व ५ सप्टेंबर
३. जालना – लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय व स्वामी विवेकानंद महाविद्यालय, मंठा यांच्या संयुक्त विद्यमाने परतूर, जि.जालना येथे आयोजन – ७ व ८ सप्टेंबर
४. छत्रपती संभाजीनगर – शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर, ११ व १२ सप्टेंबर २०२६
जिल्हयानिहाय युवक महोत्सवाची जय्यत तयारी सुरु आहे. तर चार जिल्हयातील पारितोषिक विजेते प्रथम तीन संघाना केंद्रीय युवक महोत्सवात सहभागी होणार आहे. हा महोत्सव गणेश महोत्सवानंतर घेण्यात येणार आहे. केंद्रीय युवक महोत्सव डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरामध्ये ५ ते ७ ऑक्टोबर या दरम्यान आयोजन करण्यात येणार आहे.
नोंदणी सुरु
जिल्हास्तरीय युवक महोत्सवात सर्व महाविद्यालयांनी किमान पाच कला प्रकारात सहभाग, सादरीकरण बंधनकारक करण्यात आले आहे. १ ते १२ सप्टेंबर या काळात २०२६-२७ या चालू शैक्षणिक वर्षाचा महोत्सव जिल्हास्तरावर घेण्यात येईल. मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी व सल्लागार समिती यांच्या मार्गदर्शनाखाली युवक महोत्सवाची नियमवाली तयार करण्यात आली आहे. बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर व धाराशिव या जिल्हा महोत्सवानंतर ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान विद्यापीठ कॅम्पसमध्ये केंद्रीय युवक महोत्सव होणार आहे. जिल्हानिहाय विजेत्या तीन संघाला यात सहभागी होता येणार आहे. विद्यापीठाशी संलग्नित ४८४ महाविद्यालयांनी १ ते १७ ऑगस्ट या काळात ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. तर २२ ऑगस्टपर्यंत विद्यार्थी विकास मंडळ विभागास हार्डकापी दाखल करावी लागणार आहे. संबधित महाविद्यालयाचे प्राचार्य, संस्कृतिक विभागप्रमुख यांनी सर्व सूचनांची नोंद घेऊन आपल्या संघाची ऑनलाईन नोंदणी व हॉडकॉपी विद्यार्थी विकास विभागात हरिश्चंद्र साठे यांच्याकडे जमा करावी, असेही डॉ.अंभुरे यांनी कळविले आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Maharashtranewstimes2026@gmail.com
  • Website
  • Facebook
  • Instagram

Related Posts

वसीम शेख यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव

September 8, 2026

मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीत बिघाड; ११व्या दिवशी सात किलो वजन घटले

September 8, 2026

फुलंब्री तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन

September 8, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजीनगर

वसीम शेख यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव

By Maharashtranewstimes2026@gmail.comSeptember 8, 20260
Spread the love

कन्नड:- शमाबी बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व आयशा कोचिंग क्लासेसचे संचालक वसीम शेख यांनी शैक्षणिक,…

मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीत बिघाड; ११व्या दिवशी सात किलो वजन घटले

September 8, 2026

फुलंब्री तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन

September 8, 2026

विशेष लेख : विद्यार्थी हिंसक का होतो?

September 3, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Editors Picks
Top Reviews
Advertisement
Demo
maharashtranewstimes.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo YouTube
  • Home
  • व्हिडिओ
  • छत्रपती संभाजीनगर
  • सामाजिक
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
About Us
Maharashtra News Times हे एक विश्वासार्ह डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही वाचकांना अचूक, निष्पक्ष आणि ताज्या बातम्या वेळेवर देण्यावर भर देतो.
राजकारण, समाज, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि स्थानिक घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
वाचकांचा विश्वास जपणे आणि सत्य माहिती पोहोचवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
डिजिटल माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हीच आमची बांधिलकी आहे.

Contact Us
संपादक: दिनेश गायके
मोबाईल: +91 99232 37970
ईमेल: Maharashtranewstimes2026@gmail.com
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.