छत्रपती संभाजीनगर : Safe Food, Safe Maharashtra मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने कन्नड तालुक्यातील देवगाव येथे धडक कारवाई करत गुटखा व पानमसाल्याचा मोठा साठा आणि एक इको सुझुकी वाहन जप्त केले. या कारवाईत ₹५,१८,५८२ किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी मुख्य आरोपी सचिन विलास वारे (रा. औराळा, ता. कन्नड) याच्यासह संबंधित उत्पादन कंपनीचे मालक व संचालक अशा एकूण सात जणांविरुद्ध प्रतिबंधित अन्नपदार्थांचे बेकायदेशीर उत्पादन व साठा केल्याप्रकरणी देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ०१४९/२०२६ दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त श्रीकांत करकळे व सहाय्यक आयुक्त विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी फरीद सिद्दिकी आणि देवगाव रंगारी पोलीस पथकाने संयुक्तपणे यशस्वीरीत्या पार पाडली.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
देवगाव येथे गुटखा-पानमसाल्याचा ५.१८ लाखांचा साठा जप्त; सात जणांवर गुन्हा
Related Posts
Add A Comment

