वेरूळ | प्रतिनिधी
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास वेरूळ येथील द्वादश ज्योतिर्लिंगांपैकी बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री घृष्णेश्वर महादेव मंदिरात जाऊन भगवान शिवाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मंदिरात विधिवत पूजा-अर्चना करून देशाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.
त्यानंतर त्यांनी शांतिगिरी महाराज यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यांच्या या धार्मिक भेटीप्रसंगी मंदिर परिसरात भाविकांची मोठी उपस्थिती होती.



